कर्मचारी झोपले अन् ५०० लिटर डिझेल चोरीला गेले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 11:50 PM2019-11-30T23:50:37+5:302019-11-30T23:51:09+5:30

बीड परळी या मुख्यमार्गावरील तपोवन पाटीजवळ असणाºया एका पेट्रोल पंपातून ५०० लिटर डिझेल चोरी गेले आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री सर्व कर्मचारी झोपल्यानंतर घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Staff sleeps and 1 liter diesel stolen ... | कर्मचारी झोपले अन् ५०० लिटर डिझेल चोरीला गेले...

कर्मचारी झोपले अन् ५०० लिटर डिझेल चोरीला गेले...

googlenewsNext
ठळक मुद्देतपोवन पाटीजवळील पंपावर दुसऱ्यांदा चोरी

सिरसाळा : बीड परळी या मुख्यमार्गावरील तपोवन पाटीजवळ असणाºया एका पेट्रोल पंपातून ५०० लिटर डिझेल चोरी गेले आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री सर्व कर्मचारी झोपल्यानंतर घडल्याचे सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात काही चोरट्यांनी पंपामधील डिझेल टँकचे कुलूप तोडले. तसेच त्यामध्ये पाईप टाकला. काही अंतरावर ५० लिटरचे काही कॅन ठेवले होते. त्यामध्ये पाईपद्वारे डिझेल भरले आणि चोरट्यांनी पोबारा केला. यावेळे चोरट्यांनी ३० पेक्षा जास्त कॅन भरुन डिझेल चोरल्याचे सांगण्यात आले. दरम्यान चोरट्यांना पेट्रोलपंपाच्या दिशेने गाडी येत असल्याची दिसून आली. यावेळी चोरट्यांनी काही कॅन पंपाच्या परिसरात सोडून पळ काढला. पेट्रोल पंपावरील नोंदी नुसार५०० लिटर डिझल चोरी गेल्याचे आढळून आले त्याची किंमत अंदाजे ३७ हजाराच्या घरात आहे. परंतु पेट्रोलपंप असेल तर त्याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमलेले असतात, कॅमेरे लावलेले असतात. त्यामुळे शक्यतो असे धाडस कोणी करत नाही. त्यामुळे संबंधित कोणी तरी हे कृत्य करत आहे, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान पंपाचे व्यवस्थापक चंद्रकांत कराड यांच्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पूढील तपास बीट अंमलदार सुभाष पवार हे करत आहेत.
दीड वर्षात दुसरा प्रकार
दीड वर्षापुर्वी परळी रोडवरील एका दुसºया पेट्रोल पंपावर देखील चोरी झाली होती. त्यावेळी देखील चोरट्यांनी अंत्यतं शिताफीने चोरी केल्याचे समजते. त्यानंतर हा घडलेला दुसरा प्रकार आहे. त्यामुळे पेट्रोलपंपचालकांनी सुरक्षारक्षक नेमावेत, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. तर या चोरींच्या प्रकरणाला आळा बसू शकतो. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

Web Title: Staff sleeps and 1 liter diesel stolen ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.