अडीअडचणीत धावून येणाऱ्या शिवसेनेच्या पाठीशी खंबीर उभे रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:26+5:302021-07-17T04:26:26+5:30

बीड तालुक्यातील लिंबारुई(देवी) आणि बाभुळवाडी फाटा येथे शिवसैनिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बीड : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे ...

Stand firmly behind the Shiv Sena which is running in difficulties | अडीअडचणीत धावून येणाऱ्या शिवसेनेच्या पाठीशी खंबीर उभे रहा

अडीअडचणीत धावून येणाऱ्या शिवसेनेच्या पाठीशी खंबीर उभे रहा

Next

बीड तालुक्यातील लिंबारुई(देवी) आणि बाभुळवाडी फाटा येथे शिवसैनिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बीड : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी कायम सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत धावून जाण्याची शिकवण आम्हा शिवसैनिकांना दिलेली आहे. संकट कोणतेही असो, त्याचा मुकाबला करण्यासाठी शिवसेना पक्ष सर्वात पुढे असतो. सर्वसामान्यांना अपेक्षित असलेल्या विकासासाठी शिवसेनेच्या पाठीशी खंबीर उभे रहा, असे आवाहन माजी मंत्री बदामराव पंडित यांनी केले. शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या दिवशी ते लिंबारुई (देवी) आणि बाभुळवाडी फाटा येथे झालेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे उपस्थित होते.

बीड जिल्ह्यात बुधवार १४ जुलैपासून शिवसंपर्क अभियान जोरदार राबवण्यात येत आहे. तब्बल १५ दिवस चालणाऱ्या या अभियानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जुलै रोजी खांडे आणि पंडित यांच्या नेतृत्वाखाली बीड तालुक्यातील लिंबारुई(देवी) आणि बाभूळवाडी फाटा येथे शिवसैनिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून थेट पक्षसंघटना वाढीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या शिवसंपर्क अभियानात विधानसभानिहाय, तालुकानिहाय आणि पंचायतनिहाय बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. या प्रसंगी जिल्हा सचिव वैजीनाथ तांदळे, जिल्हा समन्वयक जयसिंग चुंगडे, किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण, जिल्हा संघटक नितीन धांडे, उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी कुंडलिक खांडे म्हणाले की, शिवसेनेने नेहमीच जनहितासाठी काम केलेले आहे. कोणतीही जात,धर्म,पंथ याचा भेदभाव न करणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून घेणे व त्याचे निवारण करणे हाच खरा उद्देश आहे.

या बैठकीला रतन गुजर, कालिदास नवले, गोरख सिंघन, शेख फरजाना, सुनील सुरवसे, देवराव घोडके, सखाराम देवकर, राजू उनवणे, पंजाब काकडे, डॉ.आबुज, अरुण बोंगाने, सुदर्शन मोरे, बाळासाहेब नागटिळक, भारत मते, भागवत खाकरे, रमेश कानडे, अंगद महाराज सातपुते, सूर्यकांत मोरे, आकाश घायवाळ, बाबासाहेब पवार आदिंसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

160721\16bed_6_16072021_14.jpg

बीड तालुक्यातील लिंबारुई(देवी) आणि बाभुळवाडी फाटा येथे शिवसैनिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Stand firmly behind the Shiv Sena which is running in difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.