ग्रामीण भागात बस सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:30 AM2021-02-15T04:30:26+5:302021-02-15T04:30:26+5:30
बीड : कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात अनेक महिने बसेस बंद होत्या. आता त्या पुन्हा सुरू झाल्या आहेत, परंतु आजही ग्रामीण ...
बीड : कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात अनेक महिने बसेस बंद होत्या. आता त्या पुन्हा सुरू झाल्या आहेत, परंतु आजही ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये बसेस धावत नाहीत. प्रवासी मिळत नसल्याचे राज्य परिवहन महामंडळाकडून सांगितले जात असले, तरी प्रवाशांचे हाल आहेत.
टपऱ्यांमध्ये पेट्रोल
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये असलेल्या पानटपऱ्या व विविध दुकानांमध्ये पेट्रोलची खुलेआम विक्री केली जाते. जवळ असलेल्या पेट्रोलपंपावरून मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणले जाते व पेट्रोलमध्ये भेसळ करून ते चढ्या भावाने विकले जाते.
नेकनूर-पालसिंगण रस्त्याची दुर्दशा
बीड : तालुक्यातील नेकनूर ते पालसिंगण या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. नेकनूर हे आठवडी बाजाराचे गाव असल्यामुळे रहदारी जास्त असते. मात्र, पोथरा पाझर तलावाचे कुंभारी या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांचे व नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. या संदर्भात वेळोवेळी प्रशासनास निवेदन देऊनही दुर्लक्ष होत आहे.