धारूर खरेदी विक्री केंद्रामार्फत हरभरा खरेदी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:40+5:302021-06-05T04:24:40+5:30
धारूर : धारूर येथील खरेदी -विक्री केंद्रामार्फत शासनाच्या हमी दर प्रमाणे हरभरा खरेदी सुरू करण्यात आलेली आहे. मागील दहा ...
धारूर : धारूर येथील खरेदी -विक्री केंद्रामार्फत शासनाच्या हमी दर प्रमाणे हरभरा खरेदी सुरू करण्यात आलेली आहे. मागील दहा दिवसांमध्ये १३५ शेतकऱ्यांची हरभरा खरेदी करण्यात आली असून १ हजार ७२० क्विंटल खरेदी आतापर्यंत झाली आहे. २५ जूनपर्यंत खरेदी करण्यात येणार आहे .
धारूर तालुक्यांमध्ये यावर्षी हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा बाजारामध्ये हरभरा पिकास शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. धारूर तालुक्यामध्ये ६५९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती . हरभरा विक्रीसाठी नोंदणी झाल्यानंतर २३ मे पासून खरेदी -विक्री संघामार्फत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डामध्ये हरभरा खरेदी सुरू करण्यात आली आहे.
हरभरा खरेदी करताना धान्याची चाळणी करून खरेदी करण्यात येत आहे . मोजमाप झाल्यानंतर शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये पाच हजार दहा रुपये प्रति क्विंटल हमीभाव प्रमाणे पैसे जमा करण्यात येणार आहेत. मागील दहा दिवसाच्या कालावधीत १३५ शेतकऱ्यांच्या १ हजार ७२० क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. सकाळी ९ वाजता खरेदी सुरू करण्यात येत असून शेतकरी संख्या संपेपर्यंत चालू ठेवण्यात येत आहे . दररोज २५० ते ३०० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात येत आहे.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी
ज्या शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांची हरभरा खरेदी करण्यात येत आहे. नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना खरेदी सुरू झाल्याचे संदेश टाकण्यात आले आहेत . २५ जून पर्यंत खरेदी करण्यात येणार आहे.
-भारत चव्हाण, केंद्र संचालक, खरेदी विक्री संघ, धारूर
===Photopath===
040621\anil mhajan_img-20210604-wa0043_14.jpg