ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम तातडीने सुरू करा : लक्ष्मण पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:34 AM2021-05-19T04:34:58+5:302021-05-19T04:34:58+5:30

१७ मे रोजी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक सूर्यकांत गीते यांनी भेट देऊन आढावा घेतला. या बैठकीला आ.लक्ष्मण ...

Start construction of oxygen plant immediately: Laxman Pawar | ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम तातडीने सुरू करा : लक्ष्मण पवार

ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम तातडीने सुरू करा : लक्ष्मण पवार

Next

१७ मे रोजी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक सूर्यकांत गीते यांनी भेट देऊन आढावा घेतला. या बैठकीला आ.लक्ष्मण पवार, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डाॅ.महादेव चिंचोळे, डॉ.राजेश शिंदे, मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. या बैठकीत आ. लक्ष्मण पवार यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते यांच्याकडे वरिष्ठ पातळीवरील विविध अडचणी बाबत चर्चा केली. ऑक्सीजन प्लॅन्टचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे याबाबत आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून त्यांनी रुग्णालयातील विविध अडचणी बाबत माहिती जाणून घेतली. आरोग्य विभागाच्या मार्फत निर्णय प्रक्रिया गतिमान करावी, तसेच बायपॅप मशीन तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात. पहिल्या लाटेपेक्षा ही दुसरी लाट ही अतिशय भयानक आहे. त्यामुळे आपणही वरिष्ठ स्तरावर उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रस्तावित असलेली यंत्रणा व साहित्य तात्काळ उपलब्ध करून द्यावी. तसेच आमदार फंडातून दिलेल्या २० लाखाच्या निधीतून आवश्यक त्या यंत्रणा उभी करण्यासाठी नियोजन करत निर्णय प्रक्रिया गतिमान करून सहकार्य करावे, तसेच एजन्सी निवडण्याचे अधिकार उपजिल्हा रुग्णालयाला द्या अशी मागणी आमदार पवार यांनी या बैठकीत केली.

===Photopath===

180521\sakharam shinde_img-20210517-wa0037_14.jpg

Web Title: Start construction of oxygen plant immediately: Laxman Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.