गेवराईच्या ऑक्सिजन प्लांटचे काम तत्काळ सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:34 AM2021-05-18T04:34:16+5:302021-05-18T04:34:16+5:30
गेवराई तालुक्यातील कोरोना परिस्थितीबाबत माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी रुग्ण सेवा समिती सदस्यांसह जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेऊन ...
गेवराई तालुक्यातील कोरोना परिस्थितीबाबत माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी रुग्ण सेवा समिती सदस्यांसह जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेऊन कोविड उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली.
गेवराई : तालुक्यातील कोरोना परिस्थितीबाबत माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी रुग्ण सेवा समिती सदस्यांसह जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. गेवराई रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प तत्काळ सुरू करण्याची मागणी अमरसिंह पंडित यांनी केली.
प्रशासकीय सोपस्कार कागदावर होत राहतील, अगोदर काम सुरू करण्याचा आग्रह त्यांनी केला. या बैठकीला डॉ. सूर्यकांत गीते, उपनगराध्यक्ष महेश दाभाडे यांच्यासह डॉक्टर, पदाधिकारी उपस्थित होते.
गेवराईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत १७ मे रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गीते, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. राजेश शिंदे, डॉ. सराफ, कोरोना रुग्ण सेवा समितीचे महेश दाभाडे, ॲड. सुभाष निकम, कडुदास कांबळे, प्रा. राजेंद्र बरकसे, अक्षय पवार, अमोल वैद्य, प्रशांत जोशी, अंकुश आतकरे, प्रशांत गोलेच्छा, बाळासाहेब सानप, संदीप मडके, दादासाहेब घोडके, सोमनाथ मोटे, अरुण पवार आदी उपस्थित होते.
या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. रुग्ण सेवा समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
या बैठकीत ऑक्सिजन प्लांट तत्काळ सुरू करणे, औषधी उपलब्ध करून देणे, बायपॅप मशीन उपलब्ध करणे, रिक्त असलेल्या सर्जन व फिजिशियनच्या जागा भरणे, ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करणे, तत्काळ खर्चासाठी पाच लाख रुपयांचा निधी तालुका स्तरावर उपलब्ध करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. माजी आमदार पंडित यांनी औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करून मुबलक प्रमाणात औषधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत अनेक विषय मार्गी लागले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत अमरसिंह पंडित यांनी बैठक घेऊन मार्गदर्शन केले. गेवराईचे माजी उपनगराध्यक्ष तथा कोरोना रुग्ण सेवा समितीचे महेश दाभाडे यांनी याकामी पुढाकार घेऊन ही बैठक घडवून आणल्यामुळे सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहेत.
===Photopath===
170521\img-20210517-wa0244_14.jpg