मोठ्या आशेने तीन महिन्यांपूर्वी ऑटोमोबईल शॉप सुरू केले, अज्ञाताने पेट्रोल टाकून दिले पेटवून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 12:20 PM2024-06-19T12:20:48+5:302024-06-19T12:20:48+5:30
बीड-नगर राज्य महामार्गावरील ऑटोमोबाईल व टायर्स दुकान आगीत भस्मसात!
- नितीन कांबळे
कडा (बीड) :बीड-नगर राज्य महामार्गावरील पिंपरी घाटा येथील एका ऑटोमोबाईल व टायर्स दुकानाला मंगळवारी रात्री पावणेबाराच्या दरम्यान भीषण आग लागली. दुकानाच्या जवळ रिकामी पेट्रोल बॉटल सापडल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, तीनच महिन्यांपूर्वी सुरू झालेले हे दुकान आगीत भस्मसात होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा येथे बीड नगर राज्य महामार्गावर बंडू भागवत यांनी अवघ्या तीन महिन्यांपूर्वी शिवशंकर ऑटोमोबाईल व टायर्स दुकान सुरू केले. मंगळवारी संध्याकाळी दुकान बंद करून ते घरी गेले. रात्री बाराच्या दरम्यान दुकानातून अचानक आगीचे लोळ बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. आत टायर आणि ऑइल असल्याने संपूर्ण दुकान भस्मसात झाले.
बीड-नगर राज्य महामार्गावरील ऑटोमोबाईल व टायर्स दुकान आगीत भस्मसात! दुकानामागे पेट्रोल बॉटल आढळून आल्याने घातपाताचा संशय #beednewspic.twitter.com/RTPAoWWmHC
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) June 19, 2024
यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे चारचाकी,दुचाकीचे नवीन टायर, ट्यूब,हवा भरण्याचे चार मशिन,ऑईल डबे यासह विविध साहित्य होते.अंदाजे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले आहे.ही आग कशाने लागली कि कोणी लावली हे अद्याप समजले नसले तरी कोणीतरी खोडसाळपणा करून आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.