बिंदुसरेवरील ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:30 PM2017-12-25T23:30:13+5:302017-12-25T23:30:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गावरील बिंदूसरा नदीवरील ब्रिटीश कालीन पूल पाडण्याच्या कामास सोमवारी सुरुवात झाली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गावरील बिंदूसरा नदीवरील ब्रिटीश कालीन पूल पाडण्याच्या कामास सोमवारी सुरुवात झाली. आ. विनायक मेटे यांनी बायपास, बिंदूसरा नदीवरील पर्यायी पुलासह नवीन पूल बांधकामासाठी पाठपुरावा केला होता.
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा प्रश्न तडीस लावला. सोमवारी सकाळी १० वाजता बिंदूसरा नदीवरील कालबाह्य पूल पाडण्याचे काम सुरु झाले. यावेळी शिवसंग्रामचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अनिल घुमरे, रामहरी मेटे, पं.स. सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, बबन माने, राजेंद्र बहीर, मनोज जाधव, मुजफ्फर चौधरी, यशराज घोडके, सचिन कोटुळे हे उपस्थित होते.