बीडमध्ये राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:28 PM2017-12-31T23:28:15+5:302017-12-31T23:28:24+5:30
बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे रविवारी संत-महंतांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन आणि संत प्रतिमा पूजनाने उद्घाटन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे रविवारी संत-महंतांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन आणि संत प्रतिमा पूजनाने उद्घाटन झाले.
याप्रसंगी महादेव महाराज चाकरवाडीकर, श्रीक्षेत्र नारायणगडचे ह.भ.प.शिवाजी महाराज वे.शा.सं. धुंडीराज शास्त्री पाटांगणकर महाराज, ज्योतिषाचार्य सूर्यकांत मुळे, शांतीलाल छाजेड, सुभाषचंद्र सारडा, उल्हास संचेती, उत्तमचंद मरलेचा, पारसमल बोरा, बालाप्रसाद जाजू, रतनलाल नहार, भगीरथ बियाणी, भगीरथ चरखा, माणिकचंद नहार, प्रेमचंद कोटेचा, संपतलाल मुनोत, नगरसेवक शुभम धुत, गंगाबिशन करवा, अशोकलाल मुनोत, आसाराम खटोड, अॅड.विजयकुमार देशपांडे, राजेंद्र बन्सोडे, अॅड.सदानंद वैद्य, अभय कोटेचा, अशोक मुनोत, प्रा. डी.एस. कुलकर्णी, प्रकाश नहार, संपतलाल कोटेचा, प्रकाश राका, निखील ब्रह्मेचा, उज्ज्वल कोटेचा, राजू बंब, सतीश कोटेचा, प्रेमसागर गादिया, उज्ज्वला मुनोत, निर्मला खटोड, चंपालाल डुंगरवाल, सिध्दार्थ मुनोत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी सर्व मान्यवरांचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, सचिव सुशील खटोड, शुभम खटोड, आशिष खटोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महादेव महाराज चाकरवाडीकर म्हणाले,सुसंस्कारित समाजासाठी कीर्तन महोत्सवाची गरज आहे. इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. संयोजक भरतबुवा रामदासी यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी भाविक बहुसंख्येने उपस्थित होते. महोत्सवास मोठ्या संख्येने सहकुटुंब उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांनी केले.