शेतमजुरांच्या हाती आता स्टिलचे खुरपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:15+5:302021-07-17T04:26:15+5:30

आठवडाभरानंतर सूर्यदर्शन शिरूर कासार : गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पडत असलेल्या पावसामुळे सूर्यदर्शन झाले नव्हते. शुक्रवारी मात्र ...

Steel hoe now in the hands of agricultural laborers | शेतमजुरांच्या हाती आता स्टिलचे खुरपे

शेतमजुरांच्या हाती आता स्टिलचे खुरपे

Next

आठवडाभरानंतर सूर्यदर्शन

शिरूर कासार : गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पडत असलेल्या पावसामुळे सूर्यदर्शन झाले नव्हते. शुक्रवारी मात्र वातावरण ढगाळ असले, तरी सूर्यदर्शन तर घडलेच, परंतु उकाडा वाढल्याने घामाच्या धारासुध्दा वाहू लागल्या होत्या.

नूतनीकरणासाठी भारतीय स्टेट बँकेचे आवाहन

शिरूर कासार : जुने कर्ज भरून नवे तेही दहा टक्के वाढवून घ्या, असे आवाहन एसबीआयच्यावतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जात आहे, तर बँकेत गर्दीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

शाळा सुरू करण्याबाबत द्विधावस्था

शिरूर कासार : शाळा सुरू व्हाव्यात, असे विद्यार्थ्यांबरोबर पालक आणि शिक्षण विभाग, शिक्षकांचीदेखील मनोमन इच्छा असली, तरी शासनाच्या त्या गावांत किमान एक महिना कोरोना रुग्ण नसावा, या अटींमुळे शाळा सुरू करण्याबाबत सर्वच द्विधावस्थेत सापडले आहेत. पालक संमती पत्र देत असले, तरी काही सरपंच मात्र ही जबाबदारी नको म्हणून शाळेला परवानगी देण्यास धजावत नसल्याचे बोलले जाते. एकंदरीत कोरोनाची भीती ‘मागे येऊ देईना आणि पुढेही जाऊ देईना’ असेच म्हणावे लागत आहे.

ग्रामपातळीवर तरी आषाढी एकादशी साजरी करू द्या

शिरूर कासार : कोरोनामुळे दिंड्या पालख्यांना तसेच पायी वारीवर निर्बंध घातल्याने वारकऱ्यांना पंढरपूरला जाता येणार नाही. त्यामुळे किमान गावपातळीवर तरी दिंडी प्रदक्षिणा, टाळ-मृदंग व भजन करत आषाढी एकादशीचा आनंद मोकळ्या मनाने घेऊ द्या, आम्ही कोरोनाचे नियम पाळण्याचे भान ठेवू, अशी मागणी ग्रामपातळीवर वारकरी करत आहेत.

हमरस्त्यावर मोकाट जनावरांची वर्दळ

शिरूर कासार : मोकाट शेळ्यांचा उपद्रव कमी झाला असला, तरी अजूनही मोकाट जनावरांची मुख्य रस्त्यावरील वर्दळ मात्र कमी झालेली नाही. ही जनावरं रस्त्यामध्येच आपली बैठक मारतात, तर कधी सुसाट धावतात. त्यांची लागलेली टक्करदेखील पादचाऱ्यांसाठी भीतीची ठरते. नगर पंचायतीने लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Steel hoe now in the hands of agricultural laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.