बीड जिल्ह्यात व्यसनापायी तरुणाईचे गुन्हेगारीकडे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:11 AM2018-10-28T00:11:20+5:302018-10-28T00:12:34+5:30

परिस्थिती आणि दारू, गांजा यासरख्या व्यसनांमुळे तरूणाई गुन्हेगारीकडे पाऊले टाकत आहे. मागील तीन गुन्ह्यांतून हे उघड झाले आहे. व्यसनापायी दागिने लंपास करणे, चोरी करणे लुटमार करणे यासारखे गंभीर गुन्हे तरूण करू लागले आहेत.

Stepping into crime in youth of Beed district youth | बीड जिल्ह्यात व्यसनापायी तरुणाईचे गुन्हेगारीकडे पाऊल

बीड जिल्ह्यात व्यसनापायी तरुणाईचे गुन्हेगारीकडे पाऊल

Next
ठळक मुद्देतीन गुन्ह्यांतून उघड : दागिने लंपास, चोरी, लुटमारीचे केले गुन्हे; गुन्हेगारीऐवजी चांगले कार्य करीत नाव कमविण्याचे आवाहन

सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : परिस्थिती आणि दारू, गांजा यासरख्या व्यसनांमुळे तरूणाई गुन्हेगारीकडे पाऊले टाकत आहे. मागील तीन गुन्ह्यांतून हे उघड झाले आहे. व्यसनापायी दागिने लंपास करणे, चोरी करणे लुटमार करणे यासारखे गंभीर गुन्हे तरूण करू लागले आहेत. या चारही गुन्ह्यांतील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, तरूणाचे गुन्हेगारीकडे पडणारे हे पाऊल थांबविण्यासाठी उपाययोजना करून त्यांचे मनपरिवर्तन करण्याची गरज आहे.
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शखाली शाळा, महाविद्यालयात जावून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाते. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून कायदा व सुव्यवस्थेबद्दल माहिती दिली जाते. मात्र तरीही काही तरूण गुन्हेगारी वळत असल्याचे दिसत आहे.
हे गुन्हेगार रेकॉर्डवर नसल्याने त्यांचा तपास लावण्याचे आव्हानही पोलिसांसमोर रहात आहे. आतापर्यंत तरी हे आव्हान पोलिसांनी यशस्वी पेलली आहेत, मात्र नवखे गुन्हेगार वाढल्यास गुन्हेगारीचा टक्काही वाढल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चत...!
घटना क्रमांक - १
साधारण पंधरा दिवसांपूर्वी दिलीप बाजीराव सुरासे (रा.खोकडपुरा, औरंगाबाद) हे कार चालक पान खाण्यासाठी नगर नाक्यावरील टपरीवर आले. मात्र सर्व पानटपऱ्या झाल्याने सुरासे हे तिथेच कारमध्ये मोबाईलवर बोलत बसले होते. याचवेळी विकी राजू कांबळे (२५ रा.राजुरीवेस, बीड) व सुयोग मच्छिंद्र प्रधान (१८ रा.साईपॅलेसच्या पाठिमागे, बीड) या दोन चोरट्यांनी त्यांना लुटले. त्यांनी रोख १० हजार रुपए आणि दोन मोबाईल असा ३० हजार रूपंयाचा ऐवज लंपास केला होता. पोलीस तपासातून त्यांनी ही चोरी केवळ गांजा पिण्यासाठी पैसे नसल्याने केल्याचे निष्पन्न झाले होते.
घटना क्रमांक - २
केवळ दारू आणि गांजा पिण्यासाठी पैसे नसल्याने शेख जुबेर शेख अब्दुल (२० रा.मसरतनगर) व अमीर खान अकबर खान (रा.इस्लामपुरा) हे दोन तरूण लुटमारीचा गुन्हा करू लागले. २० सप्टेंबर रोजी श्रीराम नगर भागात अश्विनी रमेश लाखे या घरासमोर झाडू मारत होत्या. याचवेळी हे दोघे तिथे दुचाकीवरून आले. आजुबाजुला कोणी नसल्याची संधी साधून त्यांनी लाखे यांच्या गळ्यातील गंठन हिसकावून घेत पोबारा केला. भल्या पहाटे ही घटना घडल्याने दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजवरून दोघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत.
घटना क्रमांक - ३
तिसरी घटना परळीत घडली. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर किशोर नामदेव केदार (२३, रा. पिंपरखेड ता.घनसावंगी जि.जालना) याला दारूचे व्यसन जडले. जुगारही खेळायाचा. हे खेळण्यासाठी व दारू पिण्यासाठी पैसे कमी पडल्याने किशोरने दीड महिन्यांपासून दुचाकीचोरी करणे सुरू केले. चार दुचाकी चोरल्याही. मात्र पाचवी दुचाकी चोरण्यापूर्वीच बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या. केवळ दारू आणि जुगार खेळण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने तो गुन्हेगारीकडे वळल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासावरुन समोर आले आहे.
पालकांनी लक्ष देण्याची गरज
पालकांनी आपला पाल्य कोठे जातो, काय करतो, कोणासोबत असतो, त्याला व्यसन आहे का, ते पूर्ण करण्यासाठी तो पैसा कोठून आणतो, घरून पैसे दिले जात नसतील तो ऐश कोणत्या पैशांवर करतो, यासारखी विविध माहिती पालकांनी ठेवणे गरजेचे आहे.
सर्वच पाल्य वाईट नाहीत, मात्र मागील काही घटनांवरून पालकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसते. सर्वांनी सजग राहणे ही काळाची गरज असून यामुळे गुन्हेगारी नक्कीच कमी होईल.

Web Title: Stepping into crime in youth of Beed district youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.