बसस्थानक परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:29 AM2021-02-15T04:29:56+5:302021-02-15T04:29:56+5:30

कडा : शहरातील बसस्थानका सभोवती कचऱ्याचे ढिगारे पडून आहेत. परिणामी डासांचे प्रमाण वाढून, आजारांना निमंत्रण मिळत आहे. प्रवाशांसोबतच परिसरातील ...

Stink due to garbage in the bus stand area | बसस्थानक परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी

बसस्थानक परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी

Next

कडा : शहरातील बसस्थानका सभोवती कचऱ्याचे ढिगारे पडून आहेत. परिणामी डासांचे प्रमाण वाढून, आजारांना निमंत्रण मिळत आहे. प्रवाशांसोबतच परिसरातील जनतेचेही आरोग्य धोक्यात आहे.

सुशोभिकरणाचे पुतळे स्वच्छता ठेवावी

बीड : शहरातील अनेक ठिकाणी चौकामध्ये सुशोभिकरण केलेले पुतळे आहेत. या पुतळ्यांची निगा ठेवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. धूळ साचून राहत असल्यामुळे त्यांचे सौंदर्य अबाधित राहत नसून, अनेक ठिकाणी पुतळ्यांची दुरवस्था झाली आहे. संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

चाैकातील पेव्हर ब्लॉक खचू लागले

बीड : शहरातील राजीव गांधी चौक ते अंबिका चौक दरम्यान असलेले पेव्हर ब्लॉक खचू लागले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता वर खाली झाला असून, काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक फुटून वर येत असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Stink due to garbage in the bus stand area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.