चोरीची दुचाकी विकायला आला अन् पोलिसांनी पकडून नेला - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:36 AM2021-09-18T04:36:11+5:302021-09-18T04:36:11+5:30
अंबाजोगाई : लोखंडी सावरगाव जवळील लातूर टी-पॉईंट येथून १६ सप्टेंबर रोजी चोरीला गेलेल्या दुचाकीचा अवघ्या सहा तासांत छडा लावण्यात ...
अंबाजोगाई : लोखंडी सावरगाव जवळील लातूर टी-पॉईंट येथून १६ सप्टेंबर रोजी चोरीला गेलेल्या दुचाकीचा अवघ्या सहा तासांत छडा लावण्यात अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना यश आले. चोरलेली दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या चोरट्यास ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी ताब्यात घेतले. राडी (ता.अंबाजोगाई) येथे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.
सचिन राजाभाऊ कांबळे ( २८, रा. घारगाव, ता. कळंब जि. उस्मानाबाद) असे त्या संशयित चोरट्याचे नाव आहे. बुधवारी तो दुचाकी विकण्यासाठी राडी येथे आला होता. त्यानंतर तो गुरुवारीदेखील एक जुनी दुचाकी विक्रीसाठी घेऊन राडीत आला. यामुळे ग्रामस्थांचा संशय बळावला. याबाबत खबऱ्याने ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे यांनी राडी येथे धाव घेतली आणि सचिन कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यापैकी एक दुचाकी त्याने गुरुवारी सकाळी ११ वाजता लोखंडी सावरगाव जवळील टी पॉईंट येथील हॉटेलसमोरून पळवली होती. दुसरी दुचाकी मुरुड (जि.लातूर) ठाणे हद्दीतून चोरी केल्याचे तपासात उघड झाले. ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली.