Video: तक्रार दिल्याच्या कारणावरून दगडफेक करत हल्ला; दोन गट भिडले, सहा जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 18:15 IST2023-06-13T18:15:00+5:302023-06-13T18:15:34+5:30
माजलगावच्या खरात आडगावात दोन गटात राडा

Video: तक्रार दिल्याच्या कारणावरून दगडफेक करत हल्ला; दोन गट भिडले, सहा जण जखमी
माजलगाव (बीड) : आमच्या विरोधात तक्रार का दिली? या कारणावरून एका गटाने दुसऱ्या गटावर फायटर, दगड, काठ्यांनी हल्ला केल्याची घटना आज सकाळी घडली. या हल्ल्यात ६ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव येथील एका गटाविरूध्द गावातील काही लोकांनी पंचायत समितीकडे तक्रार केली होती. पाळीव वराहांचा बंदोबस्त करा अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली होती.सदरील तक्रार का दिले?या कारणावरून स्कॉर्पिओ मधुन आलेल्या ७ ते ८ जणांनी गावातील अर्जदारांच्या घरावर दगडफेक केली.दगड,काठ्या आणि फायटरने त्या लोकांवर हल्ला केला.
बीड: पंचायत समितीकडे तक्रार दिल्याच्या कारणावरून दोन गटात राडा; सहा जन जखमी, माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव येथील घटना. pic.twitter.com/W76TraKgzu
— Lokmat (@lokmat) June 13, 2023
या हल्ल्यात कृष्णा गणेश शेजुळ( वय २५ ), सुखदेव सुभाष आडाम( वय २८ ), आनंद अशोक आडाम( वय३०), ज्ञानेश्वर आशोक आडाम( वय३२), गोपाळ गणेश शेजुळ( वय३५), हरिभाऊ सोमेश्वर शेजुळ( वय३०) हे ६ जण गंभीररित्या जखमी झाले. माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जखमींना बीड येथे जिल्हा रूग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. या प्रकरणात अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हल्लेखोरांविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.