आष्टी तालुक्यात दरोडेखोरांची पोलिसांवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:42 AM2018-02-13T00:42:07+5:302018-02-13T00:43:25+5:30

आष्टी तालुक्यातील कानडी शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक झाली. यामध्ये तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तरीही प्रतिकार करीत एका कुख्यात दरोडेखोरास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून इतर तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले.

Stoning of police in Dashodhore police in Ashti taluka | आष्टी तालुक्यात दरोडेखोरांची पोलिसांवर दगडफेक

आष्टी तालुक्यात दरोडेखोरांची पोलिसांवर दगडफेक

googlenewsNext
ठळक मुद्देतीन कर्मचारी जखमी : एक कुख्यात दरोडेखोर जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : तालुक्यातील कानडी शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक झाली. यामध्ये तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तरीही प्रतिकार करीत एका कुख्यात दरोडेखोरास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून इतर तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले.

आष्टी तालुक्यातील कानडी शिवारातील बंधाºयाच्या बाजूस नदीपात्राजवळ आटल्या ईश्वर भोसले, सचिन ईश्वर भोसले, सोन्या व त्यांच्यासोबत इतर काहीजण मोटारसायकलवरून दरोड्याच्या तयारीने येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना रविवारी रात्री मिळाली होती.

सदर माहितीच्या आधारे आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.सय्यद, उपनिरीक्षक मुबारक शेख, पोलीस कर्मचारी गायकवाड, शिकेतोड, लोहार, दराडे, पिंपळे, पठाण, गुजर, काळे, गडकर, केदार, क्षीरसागर, शेख, कळसाने असे १५ जणांच्या पथकाने तत्काळ कानडी शिवाराकडे धाव घेत दोन वेगवेगळी पथके करून सापळा लावला. रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास दोन मोटारसायकल काही अज्ञात लोक हेडलाईट चालू बंद करत कानडी शिवाराकडे येत असल्याचे दिसून आले. यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी धाव घेतली असता मोटारसायकल चालकाने पोलीस कर्मचारी लोहार, पठाण आणि शिकेतोड यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, यात पठाण आणि शिकेतोड हे कर्मचारी जखमी झाले. यावेळी गुजर आणि कळसाने यांनी दुचाकीवरील एकास पकडले तर दुसरा अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.

दुस-या मोटारसायकलचा पाठलाग करणाºया पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली आणि दुचाकीस्वार दोघे दरोडेखोर पळून गेले. या दगडफेकीत पोलीस कर्मचारी पिंपळे जखमी झाले. जखमी पोलीस कर्मचा-यांवर आष्टी येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

औरंगाबाद व सोलापूर ग्रामीणमध्ये वाँटेड
सचिन ईश्वर भोसले (रा. वाहीरा) असे पकडण्यात आलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. औरंगाबाद ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण मधील अनेक गुन्ह्यात तो ‘वाँटेड’ आहे. त्याच्याकडून एक चॉपर आणि मोटारसायकल (एमएच १६ बीएक्स ४७८७) जप्त करण्यात आली आहे. आटल्या ईश्वर भोसले, ईश्वर भोसले आणि अन्य एक पळून जाण्यात यशस्वी झाले.

सचिनला तीन दिवसांची पोलीस कोठडी
पोलिसांनी ताब्यात घेतलेला कुख्यात दरोडेखोर सचिन भोसले याला सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्या. धेंड यांनी त्याला १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.

Web Title: Stoning of police in Dashodhore police in Ashti taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.