विविध संघटनांच्या वतीने आज रास्ता रोको, आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:13 AM2020-01-08T00:13:27+5:302020-01-08T00:13:45+5:30
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने प्रादेशिक व्यापक भागीदारी करार कायमस्वरूपी रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी संपुर्ण देशभरातील २४० शेतकरी संघटना, समविचारी पक्षांकडून ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे.
बीड : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने प्रादेशिक व्यापक भागीदारी करार कायमस्वरूपी रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी संपुर्ण देशभरातील २४० शेतकरी संघटना, समविचारी पक्षांकडून ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. तसेच महसूल व इतर संघटनांनी शासनाच्या आर्थिक धोरणांच्या विरोधात ८ जानेवारी रोजी संप पुकारला आहे.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देणारे विधेयक तात्काळ लागू करावे. शेतमालाला दीडपट हमीभाव मिळण्याचा कायदेशीर अधिकार विधेयक तात्काळ लागू करावे, अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई तात्काळ वाटप करावी. यासह इतर मागण्यांसाठी बीड जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी रास्ता रोको, कारखाने बंद ठेवण्याचे आवाहन देखील संघटनेच्या वतीने. जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिली आहे. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
या आंदोलनाला ७ जानेवारी सायंकाळपासूनच सुरुवात झाली आहे. धूळे-सोलापूर महामार्गावर ऊस घेऊन जाणाºया ट्रॅक्टरची हवा सोडून दिली.यावेळी स्वाभिमानी संघटनेचे गेवराई तालुका अध्यक्ष बळीराम शिंदे, उद्धव साबळे, तालुका अध्यक्ष लहू गायकवाड यांच्यासह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. सोडण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली.