कुंडलिक प्रकल्पातील मनमानी पाणी सोडणे थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:33 AM2021-04-25T04:33:27+5:302021-04-25T04:33:27+5:30

: जिल्हाधिकारी किंवा वरिष्ठांची परवानगी न घेता उपळी कुंडलिका प्रकल्पातून उजवा कालवा आणि कुंडलिका नदीपात्रातून बेसुमार पाणी ...

Stop discharging arbitrary water from Kundlik project | कुंडलिक प्रकल्पातील मनमानी पाणी सोडणे थांबवा

कुंडलिक प्रकल्पातील मनमानी पाणी सोडणे थांबवा

Next

: जिल्हाधिकारी किंवा वरिष्ठांची परवानगी न घेता उपळी कुंडलिका प्रकल्पातून उजवा कालवा आणि कुंडलिका नदीपात्रातून बेसुमार पाणी खाली सोडले जात आहे. त्यामुळे या प्रकल्पामधील पाण्याचा साठा कमी होत आहे. भविष्यामध्ये या प्रकल्पावरती अवलंबून असलेल्या गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे हा विनापरवानगी सोडण्यात येणारे पाणी तात्काळ थांबवा अन्यथा ग्रामस्थ यासाठी आंदोलन करतील, असा इशारा धुनकवाड सेवा सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण काळे यांनी दिला आहे.

कुंडलिका प्रकल्पावर असणाऱ्या आंबेवडगाव, दहिफळ, धुनकवाड या गावांचे सिंचनाखाली मोठे क्षेत्र असून पूर्णपणे या तलावावर अवलंबून आहे; परंतु या प्रकल्पावर काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी हे खाली असलेल्या गावांतील शेतकऱ्यांकडून चिरीमिरी घेऊन रात्री नियमापेक्षा जास्त पाणी सोडतात. त्यामुळे या प्रकल्पावर कोणाचेही नियंत्रण नाही, असे दिसून येत आहे. या प्रकल्पामध्ये पाणीसाठा कमी राहिला असल्याने भविष्यात पाणीटंचाई भासणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ याप्रकरणी लक्ष घालून होणारा भरमसाठ पाणी उपसा थांबवावा, नसता या सगळ्या गावांतील लोक आंदोलन करतील, असे काळे म्हणाले.

===Photopath===

240421\anil mhajan_img-20210412-wa0035_14.jpg

Web Title: Stop discharging arbitrary water from Kundlik project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.