टाकरवण येथे गोधनासह शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:51 PM2018-11-13T23:51:03+5:302018-11-13T23:51:37+5:30
दुष्काळात जनावरांना चारा छावणीऐवजी शेतकºयांना दावणीला चारा द्या, गाय, बैल, म्हैस व इतर पाळीव प्राण्यांना प्रती जनावर वीस हजार रु पये चारा अनुदान द्या, यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
टाकरवण : दुष्काळात जनावरांना चारा छावणीऐवजी शेतकºयांना दावणीला चारा द्या, गाय, बैल, म्हैस व इतर पाळीव प्राण्यांना प्रती जनावर वीस हजार रु पये चारा अनुदान द्या, यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन केले.
माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथे भगतसिंग चौकात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ बंडूराम गरड यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनातशेतकरी गोधन व बैलगाड्यांसह सहभागी झाले होते. सरकारचा गोवंशाचा पुळका फसवा असल्याचा आरोप करून कॉ. गरड म्हणाले की, सरकारने गाय, बैल विकण्यास प्रतिबंध करणारा कायदा करून शेतकºयांचा भुर्दंड वाढवला आहे. त्यामुळे आता अनुत्पादक व भाकड जनावरे पोसावी लागत आहेत. दुष्काळात कामाच्या व दुभत्या जनावरांना सांभाळणे मुश्किल झाले असताना आता भाकड जनावरांचे करायचे काय हा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. सरकारने आता दुष्काळात प्रत्येक जनावरांना वीस हजार रु पये चारा अनुदान द्यावे व अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या खात्यात वर्ग करुन आपण गोवंशाचे रक्षक असल्याचे सिद्ध करावे, असे यावेळी आंदोलनकर्ते व शेतकºयांना मार्गदर्शन करताना कॉ. गरड म्हणाले.
चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने चारा छावण्यांऐवजी शेतकºयांना थेट चारा अनुदान द्यावे, प्रत्येक जनावरामागे शेतकºयांना वीस हजार रु पये चारा भत्ता द्यावा, रोजगार हमीची कामे तात्काळ सुरु करु न या कामावर रोज किमान ६०० सहाशे रु पये वेतन द्यावे, शेतातील पिके नष्ट झाल्याने शेतकºयाला प्रतीहेक्टरी पन्नास हजार रु पये नुकसान भरपाई द्यावी, थकित पिक विम्याची रक्कम शेतकºयांना तात्काळ वाटप करावी, गरीब शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, सर्व शेतमजूर व शेतकºयांची नावे अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करून त्यांना प्रतीमाह ३५ किलो धान्य २ रु पये किलो दराने वाटप करावे, शेतकºयांचे वीज बिल माफ करावे, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फीस माफ करावी, कापसाला प्रति क्विंटल नऊ हजार रु पये भाव द्यावा, ऊसाला तीन हजार रु पये एफ आर पी द्यावा इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या मागण्यांचे निवेदन तलाठी ए.के. सपकाळ यांना देण्यात आले. या आंदोलनात माकपचे शांतीलाल पटेकर, बाबासाहेब पटेकर, रेणुकादास सुरवसे, मोहन भुंबे, शेतमजूर युनियनचे बळीराम भुंबे, किसान सभेचे नेते भाऊसाहेब झिरपे, बापू लव्हाळे, शिवाजी गायकवाड, मधुकर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर लव्हाळे, सखाराम गरड, किसन कोरडे, अभिमान शिंदे, दादा लव्हाळे, शाहूराव लव्हाळे, सूर्यभान अडागळे, गुलाब गरड, अशोक गरड, रोहिदास मस्के, गंगाराम काळे यांच्यासह शेतकरी बैलगाडी व जनावरांसह सहभागी झाले होते.