सावरगाव येथे भव्य रस्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:38 AM2021-08-14T04:38:29+5:302021-08-14T04:38:29+5:30
माजलगाव/ किट्टी आडगाव : शासनाने राज्य महामार्गावरील रस्ता अपुऱ्या अवस्थेत सोडल्याने संघर्ष समितीच्या वतीने १२ ऑगस्ट ...
माजलगाव/ किट्टी आडगाव : शासनाने राज्य महामार्गावरील रस्ता अपुऱ्या अवस्थेत सोडल्याने संघर्ष समितीच्या वतीने १२ ऑगस्ट रोजी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुर्डी पासून सावरगाव पर्यंत बंद पडलेले राज्य महामार्गाचे काम त्वरित चालू करावा या मागणीचे निवेदन आ. प्रकाश सोळंके यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी दिले.
माजलगाव तालुक्यातील राज्य रस्ता २२२ वरील सावरगाव -पायतळवाडी, किट्टी आडगाव , पारगाव कॅम्प , शहाजानपूर, राजेगाव - सुर्डी , टाकरवण , तलवाडा मार्गे बाग पिंपळगाव राज्य महामार्ग रस्त्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाग पिंपळगाव येथे २०१९ मध्ये केले होते. या रस्त्याच्या कामासाठी १७६ कोटींचा निधी दिलेला होता. परंतु बाग पिंपळगाव ते सुर्डी पर्यंत हा रस्ता दुरूस्ती करण्यात आला. तर राजेगाव, पारगाव कॅम्प , शहाजानपूर , किट्टी आडगाव मार्गे पायतळवाडी करून सावरगावला मिळतो. हा सर्व रोड हॅम प्रोजेक्ट अंतर्गत येत असून अपुऱ्या अवस्थेत शासनाने राज्य महामार्ग रस्ता सोडल्याने संघर्ष समितीने सावरगाव येथे रास्ता रोको अंदोलन केले. या आंदोलनात आ. प्रकाश सोळंके , नितीन नाईकनवरे , रमेश आडसकर , मोहन जगताप , जयदत्त नरवडे , अरूण इंगळे या प्रमुख नेत्यांची उपस्थिती असून बाबासाहेब आगे , रामचंद्र डोईजड, शरद कचरे , अनिल साळवे , विष्णू आगेसह टाकरवण आणि किट्टी आडगाव सर्कल सह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
120821\0904purusttam karva_img-20210812-wa0033_14.jpg