कुंबेफळ येथे शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी एक तास रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 11:59 PM2019-09-02T23:59:29+5:302019-09-02T23:59:55+5:30
तालुक्यातील कुंभेफळ येथे परिसरातील पंधरा गावच्या शेतकऱ्यांनी पिकांचे पंचनामे करून हेक्टरी एक लाख रु पये मदत देण्यात यावी यासह विविध मागण्यांच्या संदर्भात सोमवारी सकाळी दहा वाजता बैलगाड्या रस्त्यावर सोडून रास्ता रोको आंदोलन केले.
केज : तालुक्यातील कुंभेफळ येथे परिसरातील पंधरा गावच्या शेतकऱ्यांनी पिकांचे पंचनामे करून हेक्टरी एक लाख रु पये मदत देण्यात यावी यासह विविध मागण्यांच्या संदर्भात सोमवारी सकाळी दहा वाजता बैलगाड्या रस्त्यावर सोडून रास्ता रोको आंदोलन केले.
तालुक्यात अत्यल्प झालेल्या पावसामुळे शेतातील पिके पावसाअभावी वाळून गेल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे त्यामुळे शेतातील पिकाचे पंचनामे करून हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्यात यावी यासह खरीप २०१७ पीक विमा देण्यात यावा, रबी हंगाम २०१८ चा पीक विमा तात्काळ देण्यात यावा, चाºयाअभावी पशुधन धोक्यात आल्याने पशुधन जगविण्यासाठी दावणीला चारा उपलब्ध करून देण्यात यावा या मागण्यासंदर्भात कुंबेफळ, बनकरंजा, होळ, चंदनसावरगाव, सोनीजवळा, भाटुंबा, पिसेगाव, जवळबन, जानेगाव, ढाकेफळ, सारणी (आ) आनंदगाव (सा) व परिसरातील शेतकºयांनी केज अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर सकाळी दहा वाजता बैलगाड्या रस्त्यावर सोडून एक तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांनी निवेदन दिले.