शिरसदेवी फाट्यावर ‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:22 AM2019-06-08T00:22:05+5:302019-06-08T00:23:02+5:30

तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर शिरसदेवी फाटा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Stop the path of 'Swabhimani' on the Shirsadevi fate | शिरसदेवी फाट्यावर ‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको

शिरसदेवी फाट्यावर ‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई/शिरसदेवी : तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर शिरसदेवी फाटा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सोयाबीन पिकाचा विमा तात्काळ शेतक-यांच्या खात्यावर जमा करावा खरीप व रबी हंगामातील पीक विम्याचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर जमा करणे खरीप हंगामातील २०१९ आवश्यक ती कर्ज तात्काळ द्यावे, जायकवाडीच्या उजवा कालव्याला समांतर कालवा करून द्यावा, शिरसदेवी सर्कलमधील सिंदफणा चिंचोलीपर्यंत पाणीटंचाईचा कायमचा प्रश्न मिटवावा अशा विविध मागण्यांचे निवेदन शासनाच्या वतीने मंडळाधिकारी के.सी.पुराणिक यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र झके, अ‍ॅड.उमेश वेताळ, उद्धव साबळे, श्याम सुगडी, नानासाहेब पवार, अशोक भोसले, ज्ञानेश्वर शिंदे, विठ्ठल भारती, वडागळी माऊली, अशोक पंडित, गणेश शिंदे, माऊली मोरी, आक्र ोश वेताळ, रमेश गाडी, सुदर्शन गाडी, हरिभाऊ पटाई, दामोदर पवार, शिवाजी शिंदे व परिसरातील असंख्य शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाली होते.

Web Title: Stop the path of 'Swabhimani' on the Shirsadevi fate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.