जास्तीची फी वसुली थांबवा अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:34 AM2021-03-26T04:34:03+5:302021-03-26T04:34:03+5:30
बीड : कोरोना महामारीमुळे सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली आहे. परिणामी सर्वसामान्य माणसाला त्याची जास्त झळ पोहोचली आहे. असे ...
बीड : कोरोना महामारीमुळे सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली आहे. परिणामी सर्वसामान्य माणसाला त्याची जास्त झळ पोहोचली आहे. असे असताना शहरासह जिल्ह्यातील खासगी रुग्णालये मात्र त्यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांकडून जास्तीची फी वसुली करत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांनी ही जास्तीची फी वसुली त्वरित थांबवावी, अन्यथा रुग्णालयांसमोर तीव्र आंदोलन केले जाईल, अशा मागणीचे निवेदन रिपाइं पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. बीड शहरात अनेक नामवंत खासगी रुग्णालये आहेत. जिल्ह्यातील विविध आजारांनी ग्रासलेले अथवा अतिदक्षता रुग्ण जेव्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात तेव्हा त्यांच्याकडून वाजवी स्वरूपात फी न घेता अधिक स्वरूपात फी घेतली जात आहे. ही बाब मानवी दृष्टिकोनातून अन्यायकारक आहे. एवढेच नाही तर उपचाराच्या नावाखाली विविध चाचण्या करून फीस उकळण्यात येत आहे. रुग्णालयांनी रुग्णांकडून जास्तीची फी वसूल करू नये अन्यथा लोकशाही मार्गाने संबंधित रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपाइंचे अविनाश जोगदंड, अक्षय कांबळे, अण्णासाहेब सोनवणे, दीपक अरुण, भाऊसाहेब दळवी, चेतन चक्रे, गणेश वागमारे, पप्पू वाघमारे, कपिल इनकर, रतन वाघमारे, सनी जोगदंड यांच्यासह रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी निवेदनात दिला आहे.
===Photopath===
250321\252_bed_14_25032021_14.jpeg
===Caption===
खाजगी रुग्णालयांनी ही जास्तीची फीस वसुली त्वरित थांबवावी, अन्यथा रुग्णालयांसमोर तीव्र आंदोलन केले जाईल, अशा मागणीचे निवेदन रिपाइं पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जिल्हा प्रशासनाला दिले