जय महेश कारखान्याविरोधात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 11:57 PM2019-08-02T23:57:55+5:302019-08-02T23:58:36+5:30

माजलगाव तालुक्यातील देवकृपानगर पवारवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांच्या थकित ऊस बिलासाठी जय महेश साखर कारखाना प्रशासनाच्या विरोधात गुरु वारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Stop the road against Jai Mahesh factory | जय महेश कारखान्याविरोधात रास्ता रोको

जय महेश कारखान्याविरोधात रास्ता रोको

googlenewsNext

गंगामसला : माजलगाव तालुक्यातील देवकृपानगर पवारवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांच्या थकित ऊस बिलासाठी जय महेश साखर कारखाना प्रशासनाच्या विरोधात गुरु वारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यामुळे महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. तालुका शिवसेनेच्या वतीने, मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांत खैरे, बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याने हंगाम २०१७-१८ या वर्षातील २५० रूपयांचे बील अजूनही शेतकऱ्यांना दिले नाही. त्यात भर म्हणजे हंगाम २०१८-१९ या वर्षातील थकित ऊस बील एफ.आर.पी. प्रमाणे शेतकºयांना अदा करण्यात आलेले नाही. आजघडीला जय महेश कडे शेतकºयांची ५० कोटी रुपयांची ऊस बिले थकित आहेत. त्याचप्रमाणे २०१७-१८ ची २५० रुपये फरकाची थकित बिले २०१८-१८ या वर्षाची एफ.आर.पी.थकीत बिले आहेत. ती तात्काळ अदा करण्यात यावीत यासाठी कारखाना प्रशासनाच्या धोरणाविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, जिल्हा समन्वयक संजय महाद्वार, जिल्हा सचिव रामदास ढगे, उपजिल्हाप्रमुख सुशील पिंगळे, तालुकाप्रमुख अप्पासाहेब जाधव, माजी उपनगराध्यक्ष सुनील खंडागळे, जिल्हा समन्वयक अ‍ॅड. दत्ता रांजवण, उपतालुका प्रमुख नामदेव सोजे, उपतालुका प्रमुख अतुल उगले, तालुका सचिव पप्पू धरपडे, विठ्ठल जाधव, विक्र म सोळंके, अमोल डाके, दासू पाटील बादाडे, रमेश खामकर, मुंजाबा जाधव, सुंदर विके, सचिन दळवी, सतीश बोटे, कल्याण बल्लाळे, रवि आळणे, सर्कलप्रमुख महादेव सुरवसे, संभाजी पास्टे, सुखदेव धुमाळ, प्रकाश सोळंके, अशोक पास्टे, संदीप ढिसले, गजानन गिराम, करण थोरात,अशोक नाईकनवरे, गोविंद शिंदे, शिवसैनिक, शेतकरी सहभागी
होते.

Web Title: Stop the road against Jai Mahesh factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.