ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:37 AM2021-09-22T04:37:44+5:302021-09-22T04:37:44+5:30
केज : तालुक्यातील लाडेगाव येथील गायरानातील पिकांची नासधूस केल्याप्रकरणी २५ जणांवर दाखल केलेले खोट्या ॲट्रॉसिटीचे गुन्हे मागे ...
केज : तालुक्यातील लाडेगाव येथील गायरानातील पिकांची नासधूस केल्याप्रकरणी २५ जणांवर दाखल केलेले खोट्या ॲट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी बोरगाव रस्त्यावर सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. केज तालुक्यातील लाडेगाव येथील गायरान जमिनीतील अतिक्रमण उच्च न्यायालयाच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात काढण्यात आल्यानंतर सदर गायरान जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशाने गायरान जमिनीतील अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर या जमिनी मागील अनेक दिवसांपासून कसत असलेल्या दलित समाजातील लोकांनी सदरील जमिनीत पेरणी केल्याने लाडेगावमधील गायरान जमिनीचा वाद निर्माण झाला आहे. या गायरान जमिनीत पेरणी केलेल्या पिकांची नासधूस केल्याप्रकरणी खोट्या ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याने लाडेगाव येथील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. सदर केसेस या खोट्या असून, त्याची चौकशी सीबीआय किंवा सीआयडीमार्फत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सोमवारी सकाळी १०:३० वाजता कळंब-अंबाजोगाई रस्त्यावरील बोरीसावरगाव येथे मराठा समजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांनी आंदोलकाचे मागण्यांचे निवेदन स्वीकारले. या निवेदनावर नवनाथ अंबाड, विशाल अंबाड, दत्तात्रय अंबाड, विलास अंबाड, दिगंबर मुळे, नागेश क्षीरसागर, पांडुरंग माने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
200921\50411927-img-20210920-wa0027.jpg~200921\50411928-img-20210920-wa0028.jpg
ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी बोरगाव रस्त्यावर सोमवारी रस्ता रोको आंदोलन करताना आंदोलक~ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी बोरगाव रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करताना आंदोलक