रस्त्याच्या कामासाठी एक तास रास्ता रोको.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:23 AM2021-06-22T04:23:24+5:302021-06-22T04:23:24+5:30
रस्ता रोको आंदोलनामुळे केज कळंब रस्त्यावरील दुतर्फा बाजूस वाहनाची गर्दी झाली होती. केज : केज शहरातील दोन्ही महामार्गाचे रखडलेले ...
रस्ता रोको आंदोलनामुळे केज कळंब रस्त्यावरील दुतर्फा बाजूस वाहनाची गर्दी झाली होती.
केज : केज शहरातील दोन्ही महामार्गाचे रखडलेले काम करण्याच्या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी दुपारी एक तास रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्याचे काम करण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या दोन्ही कंपन्यांनी दोन महिन्यांच्या आत रस्त्याचे व पुलाचे काम पूर्ण करण्याबाबत लेखी हमी दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. रास्ता रोको आंदोलनाने रस्त्याच्या दुतर्फा वाहनाची गर्दी झाली होती.
केज शहरातून जाणाऱ्या खामगाव-पंढरपूर व अहमदपूर-अहमदनगर या दोन महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने शहर अंतर्गत रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून मनमानीपणाने करत आहेत. शहरातील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याने कामाचा दर्जा ही टिकून राहिलेला नाही.
तसेच केज-कळंब रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूच्या ओढ्यावरील पुलाचे व अंबाजोगाई रस्त्यावरील पिसाटी नदीवरील पुलाचे ‘काम बंद’ आहे. केज कळंब रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून तयार केलेला पर्यायी रस्ता ही निकृष्ट दर्जाचा केल्याने तो देखील खराब झाला आहे. यासह शहरातील चौकांचे कामे नव्याने करणे, छत्रपती शिवाजी महाराज चौक व भवानी चौकाच्यामध्ये असलेले सर्व अतिक्रमणे व अडथळे तत्काळ काढणे, या सर्व मागण्यांसाठी केज विकास संघर्ष समितीने रस्त्याचे काम करणाऱ्या दोन्ही कंपन्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, दोन्ही कंपन्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने केज विकास संघर्ष समितीच्यावतीने २१ जूनला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यावर एक तास रस्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनात समितीचे समन्वयक हनुमंत भोसले, नासेर मुंडे, मोहन गुंड यांच्यासह नागरिक सहभागी होते. यावेळी एपीआय मिसळे यांनी आंदोलन स्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
===Photopath===
210621\img-20210621-wa0017.jpg~210621\200-img-20210621-wa0018.jpg~210621\202-img-20210621-wa0020.jpg
===Caption===
केज शहर अंतर्गत रस्त्याचे काम करण्याच्या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करताना समितीचे प्रा.हनुमंत भोसले,भाई मोहन गुंड ,नासेर सौदागर आदी~केज शहर अंतर्गत रस्त्याचे काम करण्याच्या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करताना समितीचे प्रा.हनुमंत भोसले,भाई मोहन गुंड ,नासेर सौदागर आदी~केज शहर अंतर्गत रस्त्याचे काम करण्याच्या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करताच काम करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. यावेळी समितीचे प्रा.हनुमंत भोसले,भाई मोहन गुंड ,नासेर सौदागर आदी