उमापूर फाट्यावर दोन तास रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:29 AM2018-09-30T00:29:15+5:302018-09-30T00:29:44+5:30
नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी शनिवारी उमापूर फाटा येथे धनगर समाज उन्नती मंडळाचे रवी देशमुख, संभाजी ब्रिगेडचे सोपान दळवी व ग्रा. पं. सदस्य मुबारक शेख यांच्या नेतृत्वात तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे. त्यामुळे खरीपातील कापूस, सोयाबीन यासहित सर्व पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी शनिवारी उमापूर फाटा येथे धनगर समाज उन्नती मंडळाचे रवी देशमुख, संभाजी ब्रिगेडचे सोपान दळवी व ग्रा. पं. सदस्य मुबारक शेख यांच्या नेतृत्वात तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आला.
सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील सर्व पिके करपून गेली आहेत. कशीबशी वाढलेली पिके आता माना टाकू लागली आहेत. कापूस, सोयाबीन, मूग, बाजरी ही पिके पूर्णपणे वाया गेली असून, कापसाची वाढ खुंटलेली आहे. परिणामी लागवड खर्चही पदरात पडतो की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते संभाजी आरबड, संतोष कापसे, दयानंद कापसे, राजेंद्र डाके, उमेश शिंदे, आदर्श औटी, मजिद शेख, दत्ता बनसोडे, राहुल देशमुख, मतीन सौदागर, नईम पठाण, रघु जाधव आदी उपस्थित होते.
पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करा
४एक ना अनेक संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करण्यात यावा , हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे, चालू वर्ष २०१८ चा खरीप पीकविमा १०० टक्के मंजूर करावा, बोंडअळीचे अनुदान तात्काळ वाटप करावे, २०१६ चा भारतीय स्टेट बँक शाखा उमापूरचा विमा १२ टक्के व्याजासहित शेतकºयांना द्यावा या सहित अनेक मागण्यांचे निवेदन शेतकºयांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले.