दारू विक्री बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:50 AM2021-02-23T04:50:27+5:302021-02-23T04:50:27+5:30
पाणपाेई कोरडी बीड : शहरातील बसस्थानकात प्रवाशांसाठी बांधलेली पाणपोई कोरडीठाक पडली आहे. तसेच त्याची दुरवस्थाही होत आहे. यामुळे प्रवाशांना ...
पाणपाेई कोरडी
बीड : शहरातील बसस्थानकात प्रवाशांसाठी बांधलेली पाणपोई कोरडीठाक पडली आहे. तसेच त्याची दुरवस्थाही होत आहे. यामुळे प्रवाशांना खाजगी हॉटेलचा आधार घेण्याची वेळ आली आहे. यामुळे त्यांना नाहक भुर्दंड बसत आहे. याकडे आगारप्रमुखांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
निवाऱ्याची गरज
वडवणी : तालुका व परिसरात अनेक महत्त्वाच्या ठिकाणाहून प्रवास करण्यासाठी तासन्तास उघड्यावर ताटकळत प्रवासी उभे राहत आहेत. प्रवाशांमधून अनेकवेळा निवारा बांधण्याची मागणी होत आहे. परंतु याकडे अद्याप संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. ऊन, वाऱ्याचा त्रास प्रवाशांना होत आहे.
अंधारामुळे अडचण
धारूर : शहरातील अनेक विद्युत खांबावर दिवे नसल्याने या परिसरातील रहिवासी तसेच येणाऱ्या - जाणाऱ्या नागरिकांना रात्रीच्या वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सर्व खांबांवर नगरपालिकेने तात्काळ विद्युत दिव्यांची व्यवस्था करुन अंधार दूर करण्याची मागणी होत आहे.
उघड्या रोहित्रांमुळे धोका वाढू लागला
बीड : शहर आणि परिसरात असलेल्या अनेक रोहित्रांना दरवाजेच नाहीत. जेथे आहेत ती नेहमी उघडीच असतात. दरवाजे लावण्याकडे महावितरणचे कर्मचारी देखील डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांना सूचना देण्याची मागणी होत आहे.
स्वच्छतेची मागणी
वडवणी : शहरातील मुख्य रस्त्यांवर दुभाजक बनविण्यात आले आहेत. त्यावर वृक्ष लागवड केल्याने ते सुंदर बनले आहेत; परंतु या दुभाजकाशेजारी घाण झाल्याने हा परिसर अस्वच्छ दिसू लागला आहे. त्यामुळे नगर पंचायतने दुभाजकाच्या बाजूंची स्वच्छतेची मागणी नागरिकांतून होत आहे.