आरणवाडी तलावाच्या मागणीसाठी शिवसेनेचा तासभर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 11:54 PM2019-03-05T23:54:32+5:302019-03-05T23:55:13+5:30
आरणवाडी साठवण तलावाचे रखडलेले काम सुरू करा या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख नारायण कुरु ंद यांच्या उपस्थितीत चोरांबा येथे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
धारूर : आरणवाडी साठवण तलावाचे रखडलेले काम सुरू करा या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख नारायण कुरु ंद यांच्या उपस्थितीत चोरांबा येथे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आरणवाडी साठवण तलावाचे काम गेल्या २० वर्षांपासून रखडलेले आहे. या परिसरातील आरणवाडी, चोरांबा, थेटेगव्हाण, ढगेवाडी, सोनिमोहा, पारगाव इ. गावांसाठी हा तलाव वरदान ठरणार असून, परिसरातील जनतेचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. या परिसरातील जनतेला पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागते. या मुद्यावर शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख नारायण कुरुंद यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी तालुका प्रमुख नारायण कुरु ंद, तरु ण कैलास चव्हाण, राहुल चव्हाण, शेतकरी संघटनेचे काशीराम सिरसट, रामदास तिडके आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी तालुका प्रमुख विनायक ढगे, शहर प्रमुख बंडू शिनगारे, राजकुमार शेटे, गणेश पवार, बाबा सराफ, सीताराम चव्हाण, दिनेश चव्हाण, प्रकाश चुंचे, गणेश मोरे, आरणवाडीचे सरपंच फुटाने, सदाभाऊ शिनगारे, चंद्रकांत हरणावळ, अंकुश चव्हाण, धनराज मायकर, त्रिंबक शिंदे यांच्यासह शेतकरी, शिवसैनिक उपस्थित होते, यावेळी तहसीलदार लंगडापुरे व लघु पाट बंधारे विभागाचे कुलकर्णी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक कुकलारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.