पंचवीस गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी पात्रुड येथे ग्रामस्थांचा रस्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 06:38 PM2018-03-14T18:38:51+5:302018-03-14T18:39:59+5:30
माजलगाव तालुक्यातील लवुळ-पिपळनेर व लवुळ- परडी रस्ता गेल्या वर्षापासुन बंद आसल्याने या भागातील २५ गावच्या दळण वळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
माजलगाव ( बीड ) : लवुळ मार्ग बीडकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम रखडल्यामुळे या भागातील २५ गावाच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्याचे काम लवकर सुरु करावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज दुपारी पाञुड येथे रस्ता रोको आंदोलन केले.
माजलगाव तालुक्यातील लवुळ-पिपळनेर व लवुळ- परडी रस्ता गेल्या वर्षापासुन बंद आसल्याने या भागातील २५ गावच्या दळण वळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मागील महिन्यात सुद्धा परडी माटेगाव येथे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक महिन्याच्या अवधी मागितला होता. हा कालवधी पूर्ण झाला तरीही रस्त्याचे काम सुरु न झाल्याने माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात दुपारी पात्रुड येथे ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले.
परत १५ दिवसाचे आश्वासन
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बंडे यावेळी आंदोलनस्थळी येऊन रस्त्याचे येणाऱ्या जमिन संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. तसेच रस्त्याचे काम १५ दिवसात सुरु करू असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. आंदोलनात बाजार समिती सभापती अशोक डक, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दिपक जाधव, विश्वंबर थावरे, शिवाजी रांजवण जि.प.सदस्य चंद्रकांत शेजुळ, वसिम मनसबदार ,बालासाहेब जाधव यांच्यासह शेकडो ग्रामस्थांचा सहभाग होता.
महिनाभरापूर्वी झाले होते आंदोलन
हा रस्ता बंद असल्याने मागील महिन्यात याच २५ गावच्या ग्रामस्थांनी परडी माटेगाव येथे उपोषण केले होते. त्यावेळी रस्त्याचे काम महिनाभरात सुरु करू असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आले होते.