तालखेड फाट्यावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:06 AM2019-08-30T00:06:20+5:302019-08-30T00:07:00+5:30
बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, असा आमचा प्रयत्न असल्याचे मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन पुरंदरे यांनी सांगितले. दरम्यान या समर्थानात गुरु वारी राष्ट्रीय महामार्गावर तालखेड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
माजलगाव : भारतात लोकशाहीच्या सार्वत्रिक निवडणुकीत वापर करण्यात आलेल्या २० लाख ईव्हीएम मशीन्स अचानक गायब झाल्या त्याचा अद्यापही पत्ता नाही तर २७३ मतदारसंघात झालेले मतदान व मशीन आकडेवारी यामध्ये तफावत असल्याने या मशीनमध्ये गडबडी करता येते अशी यंत्रणा असल्याने आम्ही ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जनआंदोलन सुरू केले आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, असा आमचा प्रयत्न असल्याचे मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन पुरंदरे यांनी सांगितले. दरम्यान या समर्थानात गुरु वारी राष्ट्रीय महामार्गावर तालखेड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
येथील शासकीय विश्रामगृहावर गुरु वारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पुरंदरे म्हणाले, आता ईव्हीएम प्रश्नावर सरकार काही ऐकायला तयार नाही, म्हणून आता जास्त आक्र मक होण्याची गरज असल्याने देशात याविषयी जनजागृती करण्याचा दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. विविध पक्ष या विरोधात एकवटले असले तरी उघडपणे समोर येण्यास धजत नाहीत ही वस्तुस्थिती आहे म्हणून आम्ही हे व्यासपीठ निवडले आहे की, आता थेट जनतेत जायचे असे ठरवुन आता आंदोलने करणार त्याचा पहिला भाग बीड जिल्ह्यात तालखेड फाटा येथे एक तास रास्ता रोको आंदोलन राज्यात पहिल्यांदा झाले. याप्रमाणेच जनतेने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पुरंदरे यांनी केले.