बीडमधील डोणगाव फाट्यावर शेतक-यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:31 AM2017-11-28T00:31:57+5:302017-11-28T00:32:15+5:30
कृषी पंपाच्या वीज बिलाची रक्कम भरूनही वीज खंडीत केली. त्यामुळे तालुक्यातील तीन गावच्या २०० शेतक-यांनी सोमवारी डोणगाव फाट्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले.
केज : कृषी पंपाच्या वीज बिलाची रक्कम भरूनही वीज खंडीत केली. त्यामुळे तालुक्यातील तीन गावच्या २०० शेतक-यांनी सोमवारी डोणगाव फाट्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले.
तालुक्यातील जाधवजवळा, डोणगाव आणि शिरपुरा येथील शेतक-यांनी त्यांच्या शेतीपंपाच्या वीज बिलाचा भरुनही महावितरणच्या अधिकाºयांनी शेतक-यांच्या कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित केला. परिणामी उपलब्धता असतानाही पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहेत. महावितरणच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शिरपूरा, डोणगाव आणि जाधव जवळा या तीन गावांच्या शेतक-यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजेदरम्यान एक तास रास्ता रोको आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान केज तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. हनुमंत भोसले यांनी शेतकरी आणि महावितरणचे अधिकारी यांच्यात मध्यस्थी केली. यावेळी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी आणि महावितरणचे सहायक अभियंता एस. सी. इनामदार यांनी स्वीकारले. दोन दिवसात कृषी पंपांची वीज पूर्ववत जोडण्यात येईल, असे लेखी आश्वासन त्यांनी दिले.