गोर बंजारा ब्रिगेडचे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:38 AM2021-08-17T04:38:48+5:302021-08-17T04:38:48+5:30
जातेगाव : तालुक्यातील भेडटाकळी येथील मयत संदीप चव्हाण याच्या मारेकऱ्याला त्वरित अटक करावी व चव्हाण कुटुंबीयांना २५ लाख ...
जातेगाव : तालुक्यातील भेडटाकळी येथील मयत संदीप चव्हाण याच्या मारेकऱ्याला त्वरित अटक करावी व चव्हाण कुटुंबीयांना २५ लाख रूपये आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी गोर बंजारा ब्रिगेडच्या वतीने जातेगाव फाटा येथे शनिवारी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील भेडटाकळी येथील संदीप चव्हाण याचा मृतदेह भेडटाकळी शिवारातील एका उसाच्या शेतात आढळला होता. त्याचा खून झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईक यांनी केला होता.याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपीला त्वरित अटक करावी अशी मागणी करत गोर बंजारा ब्रिगेडच्या वतीने शनिवारी जातेगाव फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक समाज बांधव उपस्थित होते. तलवाडा पोलिसांना निवेदन देण्यात आले.
140821\3716kalidas kakde_img-20210814-wa0043_14.jpg