केज येथे शिवसेनेतर्फे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 11:47 PM2018-12-03T23:47:28+5:302018-12-03T23:47:52+5:30
केज-धारु र राज्य मार्गावरील तांबवा पाटी जवळील शाळेजवळ गतिरोधक बसविण्यात यावे, या मागणीसाठी केज तालुका शिवसेनेच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : केज-धारु र राज्य मार्गावरील तांबवा पाटी जवळील शाळेजवळ गतिरोधक बसविण्यात यावे, या मागणीसाठी केज तालुका शिवसेनेच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
केज- धारूर राज्य मार्गावरील तांबवा पाटीजवळील शाळेत तांबवा व परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. तसेच या राज्य मार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. केज-धारु र राज्यमार्गाचे काम रस्ते विकास महामंडळामार्फत करताना रस्त्यालगत असलेल्या शाळेजवळ गतिरोधकाची गरज असतानाही ते तयार न केल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. शाळेजवळील रस्त्याच्या दोन्ही बाजूस गतिरोधक तयार करण्यात यावे, या मागणीसाठी केज तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळुक यांच्या मार्गदर्शनाखाली एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी हांगे यांनी स्वीकारले.
या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे, युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात, शहरप्रमुख अनिल बडे, तालुका समन्वयक बाळासाहेब पवार, युवासेना सचिव प्रवीण खाडे, उपतालुकाप्रमुख महेश मुंडे, विद्यार्थी सेनेचे प्रकाश केदार, विद्यार्थी सेनेचे उप तालुका प्रमुख पवन चाटे, शिवसेना शाखा प्रमुख गणेश चाटे, माऊली शेळके गणेश कांदे, अशोक चाटे, तसेच गावचे ग्रामपंचायत सदस्य रामधन चाटे, शिवाजी चाटे, अजय चाटे, सचिन भाऊ चाटे, शरद चाटे, पंडित ठोंबरे, आदींसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या रास्ता रोको आंदोलनामुळे केज-धारूर राज्य मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती.