दुष्काळ जाहीर करण्यासाठी राकाँचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:34 AM2018-10-25T00:34:01+5:302018-10-25T00:35:51+5:30
भविष्यात पिण्याच्या पाण्याचा तसेच गुराढोरांच्या चा-याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने माजलगाव तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी परभणी फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सुमारे दोन तास वाहतूक खोळंबली होते. तिन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : यावर्षी माजलगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद, बाजरी आदी पिके धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याचा तसेच गुराढोरांच्या चा-याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने माजलगाव तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी परभणी फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सुमारे दोन तास वाहतूक खोळंबली होते. तिन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
माजलगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानी संदर्भात हेक्टरी ५ हजार रु पये नुकसान भरपाई द्यावी, गेल्या वर्षीचे बोंडअळीचे अनुदान तातडीने वाटप करावे, शेतीपंपाची लोडशेडींग बंद करावी, गतवर्षीचा शेतकºयांनी आॅनलाईन भरलेला पीक विमा द्यावा, पाणी टंचाईच्या उपाययोजना कराव्यात यासह अनेक मागण्यांसाठी राकाँच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. नाशिक भागातील धरणांचे ८.९९ टी.एम.सी. पाणी पैठणच्या धरणात सोडण्यात येत आहे त्यामुळे माजलगाव धरणात यातील ३ टी.एम.सी. पाणी सोडण्यात येऊन पाण्याच्या गंभीर प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्यात यावा अन्यथा सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी यावेळी दिला. येथील तहसीलदार एन.जी. झम्पलवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती अशोक डाक, रायुकाँचे मराठवाडा सरचिटणीस जयसिंग सोळंके, दीपक जाधव, जयदत्त नरवडे, नीलकंठ भोसले, वसीम मनसबदार, बाळासाहेब जाधव, चंद्रकांत शेजूळ, दयानंद स्वामी, मनोज फरके, प्रा. प्रकाश गवते, कल्याण आबूज सहभागी होते.