उपकालव्याच्या मागणीसाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:49 AM2019-01-20T00:49:11+5:302019-01-20T00:50:40+5:30

तालुक्यातील व शेवगाव येथील महत्वाचा असलेल्या जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून उपकालवा करावा या प्रमुख मागणीसाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता चकलांबा फाटा येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला.

Stop the way for sub-call demand | उपकालव्याच्या मागणीसाठी रास्ता रोको

उपकालव्याच्या मागणीसाठी रास्ता रोको

Next

गेवराई : तालुक्यातील व शेवगाव येथील महत्वाचा असलेल्या जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून उपकालवा करावा या प्रमुख मागणीसाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता चकलांबा फाटा येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी दोन्ही तालुक्यातील अनेक शेतकरी यात सहभागी झाले होते.
शेवगाव (जि. अहमदनगर) येथील चागंतपुरी, खडक मडक, प्रभुवडगावं, ठाकूर पिंपळगाव सह गेवराई तालुक्यातील हिवरवाडी, चकलांबा फाटा, पौळाचीवाडी, आडपिंपरी, खळेगाव, उमापूर, गोविंदवाडी, वडगाव, गढी सिरसमार्ग येथील सिंदफणा नदीस जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून उपकालवा करावा. त्यामुळे वरील सर्व व इतर गावातील शेत जमीन ओलिताखाली येऊन फायदा होईल. त्यामुळे हा उपकालवा त्वरीत करावा या प्रमुख मागणीसाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने शेकडो शेतकऱ्यांनी चकलांबा फाटा येथे रास्ता रोको केला. यावेळी पाणी फाऊंडेशनचे मच्छिंद्र गावडे, अशोक ढाकणे, किशन लाहोटी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र डाके, प्रहार जनशक्तीचे सुनील ठोसर, भाऊसाहेब वळकुंडे, रामेश्वर खरात, लता पंडित, डॉ. उध्दव घोडके, मनोज शेंबडे, रवींद्र पाटोळे, सुरेश जाजू, गोपाल आहेर, विजयकुमार घाडगे, माणिक गर्जे, तुषार वैद्य, सीताराम पंडित, गणेश पिकवणे, हरिभाऊ घोडके, शाम छडेदार सह अनेक जण उपस्थित होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांची गर्दी झाली होती. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. निवेदन मंडळ अधिकारी काशिद यांना देण्यात आले.

Web Title: Stop the way for sub-call demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.