महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:02 AM2019-01-12T00:02:08+5:302019-01-12T00:03:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाटोदा : सेतूचालकाने तहसील कार्यालयातील लिपीक महिला कर्मचाºयाशी अरेरावी केल्याच्या निषेधार्थ शुक्र वारी कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : सेतूचालकाने तहसील कार्यालयातील लिपीक महिला कर्मचाºयाशी अरेरावी केल्याच्या निषेधार्थ शुक्र वारी कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन करून कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सेतूचालका विरु ध्द कार्यवाही होईपर्यंत आंदोलन करण्याची भूमिका कर्मचाºयांनी घेतली आहे.
गणेश हिम्मत सानप या नावाने असलेले सेतुकेंद्र प्रवीण गाडेकर चालवतात. १० जानेवारी रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता तहसीलमधील लिपीक स्वाती घुमरे तातडीचे कार्यालयीन काम करत होत्या. वरीष्ट महिला लिपीक पोले यावेळी कार्यालयात होत्या. गाडेकर याने सोबत काही जात प्रमाणपत्रांच्या संचिका आणल्या आणि त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकत अरेरावीची भाषा वापरून बदली करण्याची धमकी दिली .
शुक्र वारी सकाळी कार्यालय उघडल्यानंतर घुमरे यांनी घडला प्रकार सहकारी कर्मचाºयांना सांगितला. कर्मचाºयांनी नायब तहसीलदार गणेश जाधव यांच्याकडे निवेदन देऊन कामबंद आंदोलन करत कार्यालयात ठिय्या दिला .
तहसीलदार रूपा चित्रक बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्याचे सांगण्यात आले. सेतूचालकांवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यात येणार असल्याचे कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा वैशाली जाधव यांनी सांगितले.
व्ही एन जाधव , वैशाली पोले, के. एस. पठाण, एस. एस. मुळीक एस. आर. वायभट, ए. जी. पवार, व्ही. व्ही. देशपांडे, एस. ए. मिसाळ, एम. एस. बडे, एस. यू. सानप, एस. एच. घरत आदी कर्मचाºयांनी ठिय्या देत कामबंद आंदोलन केले.