वीकेंड लॉकडाऊनवर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कडक अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:04+5:302021-07-19T04:22:04+5:30

धारूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असणारा वीकेंड लॉकडाऊनच्या कडेकोट अंमलबजावणीसाठी धारूर शहरात तहसीलदार वंदना शिडोळकर व सहायक पोलीस ...

Strict enforcement by administrative officials on weekend lockdown | वीकेंड लॉकडाऊनवर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कडक अंमलबजावणी

वीकेंड लॉकडाऊनवर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कडक अंमलबजावणी

Next

धारूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असणारा वीकेंड लॉकडाऊनच्या कडेकोट अंमलबजावणीसाठी धारूर शहरात तहसीलदार वंदना शिडोळकर व सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस शनिवारी (दि. १७) रस्त्यांवर उतरताच सर्व बाजारपेठ कडेकोट बंद झाली. सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे; नसता दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, तो रोखण्यासाठी शासनाने ठरवून दिलेले नियमांचे काटेकोर पालन प्रत्येकाने करणे आवश्यक असताना, वीकेंड लॉकडाऊन जाहीर असताना अत्यावश्यक सुविधा कृषी दुकान व किराणा व्यवसाय सोडता, इतर सर्व व्यवसाय कडेकोट दोन दिवस बंद ठेवण्याचा जिल्हाधिकारी यांचा आदेश असताना बाजारपेठेत व्यवसाय उघडे ठेवून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात होते. शनिवारी सकाळी सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस या रस्त्यावर उतरून व्यावसायिकांना कडक कारवाईच्या सूचना दिल्या व व्यवसाय बंद केले. त्यांनी कारवाईचा बडगा उगारताच तत्काळ उघडी असणारे व्यवसाय बंद झाले. सर्वांना एपीआय धस आणि तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी बाजारपेठेत फिरून कडक शब्दांत ताकीद दिल्या. हे दोन्ही अधिकारी रस्त्यांवर उतरल्याने बाजारपेठेत शुकशुकाट झाला. सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे नसता दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा या दोन्ही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

180721\img_20210717_104116.jpg

धारूर शहरात विकईंड लाॕकडाऊन ची अमलबंजावणी करताना अधिकारी ए पी आय सुरेखा धस

Web Title: Strict enforcement by administrative officials on weekend lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.