कडा कृ.उ.बा. समितीची सुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:27 AM2021-01-02T04:27:14+5:302021-01-02T04:27:14+5:30
आष्टी तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून कडा कृ.उ.बा समितीकडे पाहिले जाते. याच बाजार समितीमध्ये परजिल्ह्यातून आवक असते, तर परदेशात ...
आष्टी तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून कडा कृ.उ.बा समितीकडे पाहिले जाते. याच बाजार समितीमध्ये परजिल्ह्यातून आवक असते, तर परदेशात देखील मालाची विक्री होत असते. याठिकाणी ग्रामीण भागातील शेतकरी आपला पिकवलेला कापूस आणतात. व्यापारी याच्या अडतीवर घालतात; पण जेव्हा हेच व्यापारी ट्रक भरतात तेव्हा लागूनच विद्युत वाहिनीच्या तारा गेल्याने याची स्पार्किंग होऊन पेट घेतला जातो. यात व्यापारी लोकांचे लाखोंचे नुकसान होत आहे. दरवर्षी एक दोन घटना येथे घडतात. एक घटना घडली तर बाजार समितीने यातून धडा घ्यायला पाहिजे; पण व्यापारी लोकांकडून ठरलेले भाडे करारावर मोबदला घेणारी बाजार समिती सुविधा देण्यात अपुरी पडत आहे. महिन्याकाठी लाखोंची उलाढाल होते. मग गरजेचे असलेली अग्निशमन बंब का उपलब्ध केला जात नाही, हे विशेष असल्याचे शिवसंग्रामचे आष्टी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.
● विद्युत वाहिनीच्या तारा झाडाझुडपात आणि ठिकठिकाणी संरक्षण पाइप नसल्याने अचानक स्पार्किंग होऊन पेट घेतला जात आहे. तर भविष्यात हमालाच्या जिवाला काही बरेवाईट झाले तर जबाबदारी कोणाची, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत कडा कृ.उ.बा. समितीचे सभापती दत्तात्रय जेवे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, अगोदरचे माहीत नाही, आ. सुरेश धस यांना बोलून संचालक मंडळाची बैठक घेऊन लवकरच प्रस्ताव पाठवला जाईल, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.