गवराईत कडक लाॅकडाऊन अंमल; रस्त्यांवर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:35 AM2021-05-06T04:35:37+5:302021-05-06T04:35:37+5:30
तालुक्यातील व जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने याला आळा बसावा व रुग्ण संख्या कमी करण्यासाठी तीन ...
तालुक्यातील व जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने याला आळा बसावा व रुग्ण संख्या कमी करण्यासाठी तीन दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहीर केल्याने बुधवारी शहरातील मेडिकल, दवाखाने वगळता एकही दुकान सुरू नव्हते. तसेच शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट होता. रस्ते निर्मनुष्य दिसत होते. तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शास्त्री चौक, नवीन बसस्थानक, मोंढा नाका, जुने बसस्थानक येथे पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे, पोलीस निरीक्षक युवराज टाकसाळ, शरद बहिरवाळ, हनुमान जावळे, विशाल प्रधान, मिसाळसह विविध अधिकारी व पोलीस कर्मचारी हे भर उन्हात आपले कर्तव्य बजावताना दिसत होते, तर नागरिकही रस्त्यावर दिसत नव्हते. ग्रामीण भागातील तलवाडा, चकलांबा, उमापूर, जातेगांव, मादळमोही, पाडळसिंगीसह सर्कलच्या विविध गावातही कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी प्रभावी झाल्याचे चित्र दिसत होते.
फोटो : गेवराईत तीन दिवसांच्या कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी झाल्याचे बुधवारी दिसून आले. रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट होता.
===Photopath===
050521\20210505_120509_14.jpg