प्रदूषणमुक्त भारत निर्मितीसाठी छात्र सेनेचे ‘ऑपरेशन सक्सेस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:39 AM2021-09-24T04:39:20+5:302021-09-24T04:39:20+5:30
अंबाजोगाई : प्रदूषणमुक्त भारत निर्मितीसाठी राष्ट्रीय छात्र सेना ‘ऑपरेशन सक्सेस’ माेहीम राबविणार असून स्वयंसेवक म्हणून छात्रसैनिक योगदान देणार ...
अंबाजोगाई : प्रदूषणमुक्त भारत निर्मितीसाठी राष्ट्रीय छात्र सेना ‘ऑपरेशन सक्सेस’ माेहीम राबविणार असून स्वयंसेवक म्हणून छात्रसैनिक योगदान देणार असल्याची माहिती मेजर एस.पी. कुलकर्णी यांनी दिली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित स्वाराती व योगेश्वरी महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागाच्या अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत हे अभियान राबविले जाणार आहे. भारताने विविधतेतून एकता हा मूलमंत्र जगाला दिला, पण आज देशात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. मग ते पर्यावरणीय प्रदूषण व वैचारिक प्रदूषण असो. आज जगात पर्यावरणीय मूल्यांचा ऱ्हास झाल्यामुळे नैसर्गिक आपत्तीस तोंड द्यावे लागते. मोठ्या प्रमाणात दुष्काळ महापूर भूकंप या नैसर्गिक आपत्तीशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपण ही लोक चळवळ करण्यासाठी छात्रसेना वृक्षारोपण, जलसाक्षरता, स्वच्छ भारत अभियान राबवून लोकांमध्ये पर्यावरणीय जागृती करत आहे. त्याचबरोबर वैचारिक प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ज्या ज्या महापुरुषांनी काम केले त्यांनी प्रथम राष्ट्र ही संकल्पना राबवून मायभूमीसाठी सर्वस्वाचा त्याग तरुण भारताची निर्मिती केली. हा देश एकसंघ रहावा समाजातील जातीयता धर्मांधता नष्ट करण्यासाठी छात्रसेना आम्ही भारतीय अभियानाद्वारे जनजागरण करणार आहे. ह्या अभियानात चर्चासत्र, परिसंवाद, निबंध, वादविवाद स्पर्धा यांच्या माध्यमातून प्रदूषणमुक्त भारत ही लोकचळवळ करण्यासाठी छात्र सैनिक स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत. हे अभियान दोन वर्षे चालणार आहे व आम्ही यामध्ये यशस्वी होऊ, असा निर्धार सर्व एनसीसी अधिकारी व छात्र सैनिकांनी केला आहे.
220921\2604img-20210922-wa0098.jpg
छत्रसेनाधिकारी एस पी कुलकर्णी