रसायनशास्त्राचा पेपर अवघड गेल्याने अंबाजोगाईत विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 06:03 PM2018-03-06T18:03:58+5:302018-03-06T18:05:25+5:30
बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर अवघड गेल्याने आलेल्या नैराश्यातून १८ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरात उघडकीस आली.
अंबाजोगाई ( बीड ) : बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर अवघड गेल्याने आलेल्या नैराश्यातून १८ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरात उघडकीस आली.
समीर सतीश ठाकूर (वय १८) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अंबाजोगाई येथील सी.बी. स्कूलमध्ये बारावीच्या वर्गात शिकत होता. सध्या बारावीची परीक्षा सुरु असून दि. २८ फेब्रुवारी रोजी रसायनशास्त्राचा पेपर पार पडला. हा पेपर अवघड गेल्याने समीर अस्वस्थ झाला होता. हि बाब अनेकदा त्याने घरी देखील बोलून दाखविली. घरच्यांनी समजूत घालूनही तो नैराश्यातून बाहेर येऊ शकला नाही. अखेर त्याने आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास घरात कोणीच नसताना छताच्या फॅनच्या हुकला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या पार्थिवावर सायंकाळी ५ वाजता बोरूळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नगर पालिकेतील पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सतीश ठाकूर यांचा समीर हा कनिष्ठ मुलगा होता.