विद्यार्थ्यांनी स्वकर्तृत्वाने ध्येयप्राप्ती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:41 AM2019-02-03T00:41:50+5:302019-02-03T00:42:08+5:30

ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वकर्तृत्वाने प्रामाणिकतेच्या कसोटीवर खरे उतरून ध्येयप्राप्ती करावी असे प्रतिपादन डॉ. नरेंद्र काळे यांनी केले.

Students should achieve their goal independently | विद्यार्थ्यांनी स्वकर्तृत्वाने ध्येयप्राप्ती करावी

विद्यार्थ्यांनी स्वकर्तृत्वाने ध्येयप्राप्ती करावी

Next
ठळक मुद्देनरेंद्र काळे : श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम

अंबाजोगाई : विद्यार्थी जीवनामध्ये जीे संस्कारांची रुजवणूक होते त्यावरून तो विद्यार्थी आपले आयुष्य घडवित असतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ध्येयनिश्चिती आवश्यक असून, हे ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वकर्तृत्वाने प्रामाणिकतेच्या कसोटीवर खरे उतरून ध्येयप्राप्ती करावी असे प्रतिपादन डॉ. नरेंद्र काळे यांनी केले.
येथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेह -संमेलन उद्घाटन प्रसंगीआयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात काळे बोलत होते. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याच्या बाबतीत अतिशय जागरूक असले पाहीजे. सकस आहार व्यायाम व व्यसनांपासून दूर राहून आपले आरोग्य जपावे, असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी विज्ञान विभागातर्फे आयोजित विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. याप्रसंगी स्नेहसंमेलनानिमित्त विविध मंडळांमार्फत घेण्यात आलेला विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नयनरम्य कवायती, देखाव्यांनी, सुमधुर गीतांनी वातावरण भारावून गेले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर संस्था शिक्षक प्रतिनिधी आप्पा यादव, शालेय समिती अध्यक्ष प्रा.शशिकांत टेकाळे, शालेय समिती सदस्य डॉ.अतुल देशपांडे, मुख्याध्यापिका सुनंदा धर्मपात्रे, उपमुख्याध्यापक प्रभाकर वाघमारे, पर्यवेक्षक अरूण पत्की, विभागप्रमुख प्रशांत पिंपळे, संमेलनप्रमुख विजय बेंडसुरे, सहसंमेलनप्रमुख अनुराधा रांजणकर, विद्याथीर्नी प्रतिनिधी योगिता खोटे, वैष्णवी ढाकणे, विद्यार्थी प्रतिनिधी अमरनाथ सरवदे हे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा मुंडे यांनी, बक्षीस वाचन मोरेश्वर देशपांडे तर उपस्थितांचे आभार कल्पना जवळगावकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Web Title: Students should achieve their goal independently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.