विद्यार्थ्यांनी माध्यम लेखनाकडे गांभीर्याने पाहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:21 AM2021-07-19T04:21:58+5:302021-07-19T04:21:58+5:30
बीड : आजच्या काळात विविध माध्यमांचे महत्त्व वाढले असून, मुद्रित माध्यम लेखनाकडे विद्यार्थ्यांनी गांभीर्याने पाहावे. माध्यम लेखन हे आपल्याला ...
बीड : आजच्या काळात विविध माध्यमांचे महत्त्व वाढले असून, मुद्रित माध्यम लेखनाकडे विद्यार्थ्यांनी गांभीर्याने पाहावे. माध्यम लेखन हे आपल्याला नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकते, असे प्रतिपादन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील माजी हिंदी विभागप्रमुख प्रोफेसर डाॅ. माधव सोनटक्के यांनी केले.
बलभीम महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या व्याख्यानमालेचे पहिले व्याख्यान १६ जुलै रोजी पार पडले. 'माध्यम लेखन' या विषयावर ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
व्याख्यानाला प्राचार्य डॉ. वसंत सानप, उपप्राचार्य डाॅ. संतोष उंदरे, उपप्राचार्य डाॅ. गणेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी डाॅ. माधव सोनटक्के यांनी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व समाजमाध्यमे यावर सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच या माध्यमांचे विविध प्रकार, या माध्यमांसाठी लेखन कशा प्रकारे करता येते यावरही भाष्य केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रोफेसर डाॅ. ललिता राठोड यांनी केला. प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख प्रोफेसर डाॅ. बाबासाहेब कोकाटे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो. डाॅ. अमोल पालकर यांनी केले. डाॅ. मारोती यमुलवाड यांनी आभार मानले.
या व्याख्यानाला डाॅ. राजेंद्र चौहान यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व हिंदी विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.