उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथे कायमस्वरूपी अधिकारी द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:01 AM2021-02-06T05:01:58+5:302021-02-06T05:01:58+5:30
बीड : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दोन वर्षांपासून कायमस्वरूपी अधिकारी नाही. याबाबतीत वेळोवेळी शासन व प्रशासनाला निवेदनामार्फत मागणी ...
बीड : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दोन वर्षांपासून कायमस्वरूपी अधिकारी नाही. याबाबतीत वेळोवेळी शासन व प्रशासनाला निवेदनामार्फत मागणी केलेली आहे. परंतु दखल घेतली जात नसल्याने गुरूवारी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या आर. टी. ओ. कार्यालयाचे रडगाणे अद्यापही सुरूच आहे. बीडच्या पालकमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. फक्त वर्तमानपत्रात अधिकारी आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. परंतु अधिकारी मात्र आला नाही. अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांवर वचक नाही. म्हणून वाहन मालक व चालकांचे हाल होत आहेत. यासंदर्भात आम आदमी पार्टीतर्फे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, जिल्हा सचिव रामधन जमाले, शहराध्यक्ष सादेक भाई, रिपब्लिकन पीपल्स फ्रंटचे बक्शु अमीर शेख, पी. के. वीर, टॅक्सी युनियनचे अध्यक्ष बाबू भाई, प्रमोद सारडा, जाकेर चौधरी, बंडू गाडे, आसाराम खापे, राजू पुंड, रामभाऊ शेरकर आदी उपस्थित होते.