सुभेदार विजय नरूळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 01:46 PM2023-04-13T13:46:05+5:302023-04-13T13:46:33+5:30

सुभेदार विजय नरूळे यांचे मेरठ येथे कर्तव्यावर असताना वीरमरण

Subhedar Vijay Narule was cremated with guard of honor | सुभेदार विजय नरूळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सुभेदार विजय नरूळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

googlenewsNext

- नितीन कांबळे 
कडा ( बीड):
सुभेदार विजय नारायण नरूळे ( ४५) यांचे बुधवारी मेरठ येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले. त्यांच्यावर आज सकाळी अंभोरा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील सुपुत्र विजय नारायण नरूळे १९९८ मध्ये सैन्यदलात सहभागी झाले. सध्या ते उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे ५२२ एएससी बटालियनमध्ये सुभेदार पदावर कार्यरत होते. बुधवारी सकाळी परेडमध्ये सहभागी असताना अचानक हृद्यविकाराच्या धक्क्याने सुभेदार विजय नरुळे कोसळले. तपासणी नंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

दरम्यान, आज सकाळी ९ वाजता त्यांचे पार्थिव मुळगावी अंभोरा येथे आणण्यात आले. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अंतिम दर्शनासाठी यावेळी गर्दी केली होती. सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी,दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 
सैन्यातील जवान, बीड मुख्यालयातील पोलिस, उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार विनोद गुंड्डमवार , सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, त्रिदल संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Web Title: Subhedar Vijay Narule was cremated with guard of honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.