आष्टीत तोतया परीक्षार्थीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:07 AM2018-02-28T00:07:41+5:302018-02-28T00:07:47+5:30

बारावी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थी रोज नवनवे गैरव्यवहार करताना आढळून येत आहेत. असाच एक प्रकार सोमवारी आष्टीत उघडकीस आला. दुस-याच्या जागेवर बसून परीक्षा देणाºया तोतया विद्यार्थ्यावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून जिल्ह्यात आजही परीक्षा केंद्रांमध्ये गैरप्रकार चालत असल्याचे उघड झाले आहे.

Subsequently, filing an indictment against the imposter candidate | आष्टीत तोतया परीक्षार्थीवर गुन्हा दाखल

आष्टीत तोतया परीक्षार्थीवर गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : बारावी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थी रोज नवनवे गैरव्यवहार करताना आढळून येत आहेत. असाच एक प्रकार सोमवारी आष्टीत उघडकीस आला. दुसºयाच्या जागेवर बसून परीक्षा देणाºया तोतया विद्यार्थ्यावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून जिल्ह्यात आजही परीक्षा केंद्रांमध्ये गैरप्रकार चालत असल्याचे उघड झाले आहे.

२६ फेब्रुवारी सकाळी ११ ते २ या वेळेत भौतिकशास्त्र या विषयाचा पेपर होता. आष्टी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील हॉल क्र. दोनमध्ये सहशिक्षिका शोभा गंगाधर नरोटे या पर्यवेक्षक म्हणून होत्या. या हॉलमध्ये एकूण २५ परीक्षार्थी होते. परीक्षार्थींची हजेरी नोंदवून स्वाक्षरी घेत असताना नरोटे यांना प्रवीण त्रिंबक भांडवलकर या परीक्षार्थीच्या नावाने दुसराच एक तोतया परीक्षार्थी प्रविण अशोक पौळे (रा. चापडगाव, ता. कर्जत जि. अहमदनगर) हा बसल्याचे आढळून आले.

त्याची सखोल चौकशी केल्यानंतर तो तोतया असल्याची खात्री नरोटे यांना पटली. त्यांनी ताबडतोब ही माहिती केंद्र संचालिका सुलोचना सोनदे यांच्या कानावर घातली. त्यानंतर सदरील तोतया परीक्षार्थीकडून प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका हस्तगत करण्यात येऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

याप्रकरणी, पर्यवेक्षिका शोभा गंगाधर नरोटे यांच्या फिर्यादीवरून बोगस परीक्षार्थी प्रविण अशोक पौळ आणि त्याला प्रोत्साहन देऊन सहकार्य करणारा प्रवीण त्रिंबक भांडवलकर या दोघांवर महाराष्ट्र गैरव्यावहार अधिनियमच्या कलम ७ अन्वये आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

तोतया नगर जिल्ह्यातील
तोतया विद्यार्थी हा अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचे आढळून आले. त्याची सखोल चौकशी केली तो तोतया असल्याचे पर्यवेक्षिका नरोटे यांच्या लक्षात आल्यानंतर ही माहिती केंद्र संचालकाच्या कानावर घातली.

Web Title: Subsequently, filing an indictment against the imposter candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.