कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:30 AM2021-01-22T04:30:28+5:302021-01-22T04:30:28+5:30

पडोवा विद्यापीठ, इटली यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम. एस्सी. ॲग्रीकल्चर) प्रवेश परीक्षेत महाविद्यालयातील विद्यार्थी मेका साई नागार्जुन रेड्डी ...

Success of agricultural college students | कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

Next

पडोवा विद्यापीठ, इटली यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम. एस्सी. ॲग्रीकल्चर) प्रवेश परीक्षेत महाविद्यालयातील विद्यार्थी मेका साई नागार्जुन रेड्डी याने घवघवीत यश मिळवून प्रवेश मिळविला. तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम. एस. सी. ॲग्रीकल्चर) प्रवेश परीक्षेत तब्बल सात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळून राज्यातील वेगवेगळ्या शासकीय कृषी महाविद्यालय मध्ये प्रवेश मिळविला आहे. यामध्ये आशा देशमाने, आरती पाटील, हीना शेख, मोहिनी शेवाळे, सचिन ससाणे, निलेश माने, विशाल बिरादार आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संस्थेचे अध्यक्ष भीमराव धोंडे , संचालक अजय धोंडे, प्राचार्य श्रीराम आरसुळ, प्रशासकीय अधिकारी डॉ. डी . बी. राऊत, प्रा. शिवाजी विधाते, दत्‍तात्रय गिलचे, संजय शेंडे, प्रा. गोकुळ नवसरे, प्रा. पोपट काळे, प्रा. इर्शाद तांबोळी, प्रवीण जाधव, प्रा. महेश साबळे, प्रा. सागर देसाई पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

Web Title: Success of agricultural college students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.