बालाजी शिक्षण प्रसारकच्या विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:24 AM2021-07-16T04:24:15+5:302021-07-16T04:24:15+5:30

या महाविद्यालयातील ८ विद्यार्थी सर्वोत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. सदरील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एम.फार्मसी या पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्याला ...

Success of students of Balaji Shikshan Prasarak | बालाजी शिक्षण प्रसारकच्या विद्यार्थ्यांचे यश

बालाजी शिक्षण प्रसारकच्या विद्यार्थ्यांचे यश

Next

या महाविद्यालयातील ८ विद्यार्थी सर्वोत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. सदरील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एम.फार्मसी या पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्याला दरमहा १२०००/- रूपये विद्यावेतन मिळते. या परीक्षेमध्ये गीतांजली शेवाळे हिने २४५ गुण संपादन करून भारतात २४१ वा क्रमांक मिळविला आहे. तसेच अनुसया सौंदणकर हिने २०७० वा, सलोनी मुथा हिने १८५१ वा, स्वाती गुंजकर हिने २०७० वा, अंजली माचवे हिने २३२३ वा, तर दिनेश राऊत याने ३४६९ तसेच जिनीषा डागा हिने ३४६९ आणि धनश्री मुंदडा हिने २५४० वा क्रमांक मिळविला आहे. तसेच एनआयपीईआर-२०२१ या परीक्षेमध्ये अंजली माचवे हिने संपूर्ण भारतात ८५० वा, अनुसया सौंदणकर हिने १०४८ वा व सलोनी मुथा हिने १४३४ वा आणि दिनेश राऊत याने २२८८ वा क्रमांक प्राप्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये प्राचार्य कृष्णा झांबरे, प्राचार्य डॉ. संतोष तरके, प्रा. नरेशकुमार जैस्वाल, मंजूषा केरप्पा आणि इतर सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी, प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी, प्रा. वसंतराव चव्हाण, डॉ. डी. एच. थोरात, संस्थेचे अध्यक्ष भूषण मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

150721\img-20210715-wa0078.jpg

विध्यार्थी फोटो

Web Title: Success of students of Balaji Shikshan Prasarak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.