वॉटरकप स्पर्धेतील यशस्वी गावांना मिळणार ७० लक्ष रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:05 AM2019-03-09T00:05:15+5:302019-03-09T00:06:01+5:30

जिल्ह्यातील अनेक गावांध्ये पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या राज्यस्तरीय , तालुकास्तरीय गावांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुरस्कारासाठी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

Successful villages in the watercup competition will get 70 lakh rupees | वॉटरकप स्पर्धेतील यशस्वी गावांना मिळणार ७० लक्ष रुपये

वॉटरकप स्पर्धेतील यशस्वी गावांना मिळणार ७० लक्ष रुपये

Next
ठळक मुद्देगावातील विकासाला मिळणार गती : विकास कामांसाठी असेल प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस, अनेक गाव झाले सहभागी

बीड : जिल्ह्यातील अनेक गावांध्ये पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या राज्यस्तरीय , तालुकास्तरीय गावांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुरस्कारासाठी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. मिळालेल्या पुरस्काराच्या निधीतून गावांमध्ये विविध विकास कामे करण्यात येणार आहेत.
पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये अनेक गावांनी सहभाग नोंदवला आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभागामधून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी मुरल्याने भूजलपातळी वाढणार आहे. स्पर्धेतील यशस्वी गावांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यासाठी निधी दिला जाणार आहे.
गाव विकासाला मिळणार गती
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमतून यशस्वी गावांना ५ लाख व ३ लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. मिळणाऱ्या पुरस्काराच्या रकमेमधून मृदासंधारण, जलबचत, रोपवाटीका, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. या कामांचे अंदाजपत्र तयार करुन संबंधीत विभागाकडून कामे करुन घेणे बंधनकारक आहे. मिळालेली पुरस्काराची रक्कम संबंधीत गावच्या ग्रामपंचायत खात्यात जमा करण्यात आली आहे.

Web Title: Successful villages in the watercup competition will get 70 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.