परळी गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी सुदाम मुंडेची रवानगी न्यायालयीन कोठडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 04:55 AM2020-09-16T04:55:45+5:302020-09-16T04:56:13+5:30
मंगळवारी सुदाम मुंडेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
बीड : परळी गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी सुदाम मुंडे याने बेकायदेशीररीत्या सुरू केलेल्या दवाखान्यात उपकरणे व औषधी पुरविणारे पोलिसांच्या हाती लागले आहेत. औषधांवरील कारवाई संदर्भात परळी पोलिसांनी औषध प्रशासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. तर उपकरणे पुरविणारा कोरोनाबाधित असल्याने तो क्वारंटाइन आहे. त्यामुळे त्याला अद्याप चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही. परंतु या दोघांवरही सध्या कारवाईची टांगती तलवार आहे. दरम्यान, मंगळवारी सुदाम मुंडेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली .
मुंडे याने जामिनावर बाहेर येताच पुन्हा बेकायदेशीररीत्या दवाखाना सुरू केला होता. ५ सप्टेंबर रोजी आरोग्य, महसूल व पोलीस प्रशासनाने त्याच्या दवाखान्यावर छापा टाकून त्याचा पर्दाफाश केला होता. सुदामच्या दवाखान्यात एक्स-रे मशीनसह इतर उपकरणे आणि औषधांचा मोठा साठा सापडला होता. हे सर्व त्याला परळीतीलच दोन व्यक्तींनी पुरविले होते. त्यांची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.